घरमहा @२८८जामनेर विधानसभा मतदारसंघ - म.क्र. १९

जामनेर विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १९

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील जामनेर (विधानसभा क्र.१९) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जामनेर जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी याच तालुक्यातून रस्ता जातो. जामनेर तालुक्यात कपाशी, हरभरा, मका, चवळी, सोयाबीन, उडीद यांचे पिक शेतकरी घेतात. सर्व घटकाला जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे.

मतदारसंघ क्रमांक – १९

- Advertisement -

आरक्षण – खुला

मतदार संख्या
पुरुष – १,६०,६१५
महिला – १,४७,८४९
तृतीयपंथी – ४
एकुण – ३,०८,४६८

- Advertisement -

विद्यमान आमदार – गिरीश महाजन, भाजप

राज्याचे जलसंपदा मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यात एकहाती वर्चस्व कायम ठेवलेले आहे. महाजन सध्या राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण मंत्री असून जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत. त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी तालुक्यात गिरीश महाजन यांची ‘वोटबँक’ मजबूत करून ठेवली आहे. येथील नगरपालिकेवर देखील भाजपची सत्ता असून त्यांच्या सौभाग्यवती साधना महाजन येथे नगराध्यक्ष आहेत. मोठ्या विक्रमाधिक्याने नगरपालिकेवर भाजपाने सत्ता मिळविली होती. हा जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी याच तालुक्यातून रस्ता जातो. जामनेर तालुक्यात कपाशी, हरभरा, मका, चवळी, सोयाबीन, उडीद यांचे पिक शेतकरी घेतात. सर्व घटकाला जोडून ठेवण्यात गिरीश महाजन यांना यश आले आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघ आमदार गिरीश महाजन

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

गिरीश दत्तात्रय महाजन – भाजपा – १,०३,४९८
दिगंबर केशव पाटील – राष्ट्रवादी कॉंग्रेस – ६७,७३०


हे देखील वाचा – ४- रावेर लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -