घरमुंबईमहापालिकेत स्वीय सहाय्यकांची कामे करणार्‍या लघुलेखकांना विशेष भत्ते

महापालिकेत स्वीय सहाय्यकांची कामे करणार्‍या लघुलेखकांना विशेष भत्ते

Subscribe

स्वीय सहाय्यक पदांसाठी मागासवर्गीय कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने सध्या ही पदे रिक्त असल्यामुळे आयुक्त अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक पदाची कामे करणार्‍या वरिष्ठ आणि कनिष्ठ लघुलेखकांना आता प्रत्येक महिन्याला १ हजार १२५ रुपये विशेष भत्ता आणि ५०० रुपये निवासी दूरध्वनी भत्ता दिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेतील आयुक्तांसह सर्व महत्वाच्या पदांसाठी स्वीय सहाय्यक पदांसाठी मागासवर्गीय कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने सध्या ही पदे रिक्त आहेत. परिणामी या पदांचा भार वरिष्ठ तसेच कनिष्ठ लघुलेखकांवर पडत आहे. त्यामुळे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कार्यालयात स्वीय सहाय्यक पदाची कामे करणार्‍या वरिष्ठ आणि कनिष्ठ लघुलेखकांना आता प्रत्येक महिन्याला १ हजार १२५ रुपये विशेष भत्ता आणि ५०० रुपये निवासी दूरध्वनी भत्ता दिला जाणार आहे.

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या दालनातील पदे रिक्त

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये स्वीय सहाय्यकांची एकूण ३५ पदे असून त्यापैकी १२ पदे ही मागासवर्गीयांकरता आरक्षित आहेत. या स्वीय सहाय्यक पदांपैंकी २७ पदे कार्यरत असून ८ पदे रिक्त आहेत. परंतु रिक्त असलेल्या ८ पदांकरता मागासवर्गीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने ही पदे रिक्त आहेत. मागासवर्गीय कर्मचार्‍यांकरता राखीव असलेल्या पदांकरता कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने मागील बर्‍याच वर्षांपासून स्वीय सहाय्यकांची ही पदे रिक्त आहेत. ही स्वीय सहाय्यक पदे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्या कार्यालयातील असून ही पदे बर्‍याच कालावधीपासून रिक्त असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रिक्तपदामुळे कार्यालयातील वरिष्ठ लघुलेखक तसेच कनिष्ठ लघुलेखक पदावरील कर्मचार्‍यांकडून स्वीय सहाय्यक पदाची कामे करून घेतली जात आहेत. परंतु त्यांना कोणताही अतिरिक्त कार्यभार भत्ता दिला जात नाही. त्यामुळे या कनिष्ठ व वरिष्ठ लघुलेखकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांच्या कार्यालयातील नियमित स्वीय सहाय्यकांना देण्यात येणारा विशेष भत्ता आणि निवासी दूरध्वनी भत्ता स्वीय सहायक पदाची कामे करणार्‍या वरिष्ठ आणि कनिष्ठ लघुलेखकांना देण्यात येणार आहे. यामध्ये आयुक्त आणि अतिरिति आयुक्तांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक पदाची जबाबदारी सांभाळणार्‍या लघुलेखकांना प्रत्येक महिन्याला १ हजार १२५ रुपये विशेष भत्ता आणि ५०० रुपये निवासी दूरध्वनी भत्ता आणि उपायुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यकाची कामे करणार्‍या लघुलेखकांना प्रत्येक महिन्याला ७५० रुपये विशेष भत्ता आणि ५०० रुपये दूरध्वनी भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई महापालिका आर्थिक संकटात


C

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -