घरदेश-विदेश१२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी फेल

१२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी फेल

Subscribe

आयपीएस पोलीस सेवेत रुजू होण्याअगोदर घेण्यात येणाऱ्या अंतिम टप्पयातील परिक्षेत १२२ पैकी ११९ पोलीस अधिकारी नापास झाले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि आयपीएस केडरसाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांना हैदराबादच्या ‘सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अॅकॅडमी’मध्ये पदवी प्राप्त करावी लागते. सेवेत रुजू होण्याअगोदर नवोदित अधिकाऱ्यांना या अॅकॅडमीची परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र, यावर्षी या परिक्षेत १२२ पैकी ११९ नवोदित अधिकारी नापास झाले आहेत. त्यांना या परिक्षेत आणखीन तीन संधी दिल्या जाणार आहेत. परंतु, आताच्या या निकालाने सर्वांना धक्का बसला आहे.

नापास झाल्यानंतरही सेवेत रुजू, पण…  

नापास झाल्यानंतरही या ११९ नवोदित आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांना पदवीधराची पदवी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सेवेत रुजू होता येणार आहे. मात्र, पुढच्या तीन प्रयत्नांमध्ये ते पास झाले नाहीत तर त्यांना सेवेतून बाहेर काढण्यात येईल. याअगोदर २०१६ मध्ये दोन आयपीएस अधिकारी ही परिक्षा उत्तीर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे त्यांना सेवेतून मूक्त करण्यात आले होते.

- Advertisement -

अॅकॅडमीच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले

अॅकॅडमीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके अधिकारी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे नापास झालेल्या या यादित ऑक्टोबरच्या परेडमध्ये ‘मेडल’ आणि ‘ट्रॉफी’ मिळवणारे अधिकारी देखील आहेत. यामध्ये फॉरेन पोलीस फोर्सचे सगळेच अधिकारी नापास झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नापास झालेल्या अधिकाऱ्यांना आणखीन एक परिक्षा देता येईल. अॅकॅडमीच्या इतिहासात आतापर्यंत असे पहिल्यांदा घडले आहे. लोक परिक्षेत नापास जरुर होतात, मात्र अशाप्रकारे जवळजवळ सगळेच अधिकारी नापास नाही झाले’. अॅकॅडमीच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार अधिकाऱ्यांना नापास झाल्यानंतरही पदवीधराचे प्रमाणपत्र मिळणार असून त्यांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -