घरमहाराष्ट्रसुप्रीम कोर्टाला मिळणार मराठी सरन्यायाधीश?

सुप्रीम कोर्टाला मिळणार मराठी सरन्यायाधीश?

Subscribe

न्या. गोगोई यांनी सुचवले न्या. शरद बोबडे यांचे नाव

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी मराठी माणूस विराजमान होणार असल्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात म्हणजेच 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार, रंजन गोगोई यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. न्या. शरद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी झालेल्या खंडपीठाचे दुसरे मुख्य न्यायाधीश आहेत.

- Advertisement -

नागपूरचे आहेत न्या. शरद बोबडे,२०१३ पासून सुप्रीम कोर्टात 
शरद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. ते 1978 मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरू केला. 1998 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील करण्यात आले.

मार्च 2000 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मध्य प्रदेश हायकोर्टाचे सरन्यायाधीश म्हणूनही शरद अरविंद बोबडे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र कायदा विद्यापीठ, मुंबई आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूर येथे कुलपती म्हणूनही काम पाहिले आहे. ते 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होतील. त्यांची नियुक्ती सरन्यायाधीशपदी झाल्यास ते ५२३ दिवस त्या पदावर रहाणार आहेत. आतापर्यंत 46 सरन्यायाधीशांपैकी फक्त 16 जणांना 500 दिवसांचा कार्यकाळ मिळाला आहे. त्यात बोबडे यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -