घरमुंबईमुख्यमंत्रीपदाच्या खटाटोपवर राऊत यांचे मार्मिक ट्विट

मुख्यमंत्रीपदाच्या खटाटोपवर राऊत यांचे मार्मिक ट्विट

Subscribe

भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन १८ दिवस निघून गेले. मात्र, राज्यात अध्यापही सत्ता स्थापन झालेली नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मतदानापूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, मतदानानंतर निकाल जाहीर झाल्यावर दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले. भाजपला निवडणुकीत १०५ जागांवर तर शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांची युती राहिली असती तर महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होण्यास विलंब झाला नसता. मात्र, मंत्रीपदासांठी दोन्ही पक्षातील मतभेद वाढले आणि दोघांना टोकाची भूमिका घ्यावी लागली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. ‘रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी’, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अरविंद सावंत देणार केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा


 

- Advertisement -

भाजप विरोधी बाकावर बसणार

संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून दररोज सकाळी प्रसारमाध्यमांसमोर येऊन शिवसेना पक्षाची भूमिका मांडत आहेत. या भूमिकेत त्यांनी बऱ्याचदा भाजपवर टीका केली. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, भाजपने देखील शिवसेनेच्या भूमिकेचा विचार केला नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. मात्र, भाजपने त्या निमंत्रणाला सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आता भाजप विरोधकांच्या बाकावर बसणार आहे.

राऊत यांच्या ट्वीटचा भावार्थ

भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत, अशी चर्चा आहे. तिथे त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक होणार आहे. एकेकाळी काँग्रेस पक्षावर ‘सामना’ अग्रलेखात काँग्रेसवर टीका करणारे संजय राऊत आज मैत्रीचा प्रस्ताव घेऊन सोनिया गांधी यांच्याकडे जाणार आहेत. या बैठकीत सोनिया गांधी जर सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार झाल्या तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. याशिवाय राऊत वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी संजय राऊत जे खटाटोप करत आहेत त्याच संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -