घरमुंबई...तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार नाही!

…तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार नाही!

Subscribe

राज्यात सरकार स्थापनेपासून भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसेनेला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का देण्याच्या विचारात आहे. यासाठी महापालिकेत नवीन समिकरणे जुळवून भाजप आता महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला विरोधी पक्षात बसवण्याच्या पावित्र्यात आहे.

राज्यात भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्यामदतीने सत्ता स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबई महापालिकेत चक्क भाजपने काँग्रेसकडे मदतीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्यावतीने शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धार केला आहे. जर राज्यात सरकार स्थापनेपासून भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार्‍या शिवसेनेला मुंबई महापालिकेत जोरदार धक्का देण्याच्या विचारात आहे. यासाठी महापालिकेत नवीन समिकरणे जुळवून भाजप आता महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला विरोधी पक्षात बसवण्याच्या पावित्र्यात आहे.

भाजप काँग्रेस,राष्ट्रवादी,सपाच्या संपर्कात

मुंबई महापालिकेतील महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गाचे पडल्यानंतर या पदासाठी २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून त्यादृष्टीकोनातून आता राजकीय समिकरणांची जुळवाजुळव सुरु आहे. राज्यातील सत्ता केवळ शिवसेनेमुळे स्थापन करण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे आपल्याला सत्तेपासून दूर ठेवणार्‍या शिवसेनेला आता मुंबई महापालिकेत अद्दल घडवण्याचा विचार भाजपचे नेते करत असून त्याद़ृष्टीकोनातून त्यांनी आता इरेला पेटत महापौरपदावरून शिवसेनेच्या उमेदवाराला दे धक्का देण्याचा निर्धार केल्याची माहिती मिळत आहे. मागील २५ वर्षांपासून भाजपच्या पाठबळावर महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, कधीही सत्तेसाठी भाजपने शिवसेनेशी फारकत घेतली नाही. उलट मागील अडीच वर्षांत कोणत्याही अटींशिवाय शिवसेनेला पाठिंबा देत मदत केली आहे. परंतु, राज्यात जर शिवसेना भाजपशी फारकत घेणार असेल तर मुंबई महापालिकेत इंगा दाखवलाच जाईल,असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपचे महापालिका गटनेते आणि खासदार मनोज कोटक यांनी विरोधी पक्षनेते रवी राजा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्याशी गुप्त बैठक केली. यावेळी कोटक यांनी काँग्रेसला मदत करण्याची मागणी केली. खुद्द विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला दुजोरा देत, काँग्रेसकडे भाजपने महापौर निवडणुकीसाठी पाठिंबा मागितला असल्याचे कबूल केले. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप सध्या जरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असला तरी सर्व बाजुंनी समिकरणांचा विचार करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ०८ आणि सपाचे ०६ अशाप्रकारे १४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेची सत्ता महापालिकेतून उलथवून टाकण्याचा प्रयत्नात असल्याची बोलले जात आहे. भाजपचे सध्या ८३ नगरसेवक असून या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांची संख्या ९७ होणार आहे. त्यातुलनेत शिवसेनेचे ९४ नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्तेची समिकरणे जुळली जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्नात भाजपचे नेते आहेत. तर राज्यात काँग्रेस पक्ष शिवसेनेला मदत करण्याच्या मनस्थितीत नसल्याने महापालिकेतही काँग्रेसची शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता कमीच असल्याचेही बोलले जात आहे.


हेही वाचा – केडीएमसीच्या महासभेत इंजिनाला कमळाची साथ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -