घरट्रेंडिंगअयोध्येच्या रामलल्लासाठी महिलेने केले होते २७ वर्ष व्रत

अयोध्येच्या रामलल्लासाठी महिलेने केले होते २७ वर्ष व्रत

Subscribe

वय वर्ष ८१ असणाऱ्या वृद्ध महिलेने अयोध्येच्या राममंदिरासाठी केले व्रत

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणारी वय वर्ष ८१ असणाऱ्या वृद्ध महिलेने अयोध्येच्या राममंदिरासाठी व्रत केले होते. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल त्यानंतरच हे व्रत सोडेल, अशी ठाम भूमिका या महिलेची ठरलेली होती. दरम्यान, या प्रकरणाता निकालाचा अंतिम निर्णय येई पर्यंत अन्नाचा कण ग्रहण करणार नाही असा या वृद्ध महिलेचा संकल्प होता. या महिलेने २७ वर्ष फक्त दूध आणि फलाहाराचे सेवन ती करत होती.

मागील २७ वर्ष व्रत करत होती ही वृद्ध महिला

शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागल्यानंतर या महिलेचे व्रत सुटणार आहे. या व्रताची संमाप्ती करण्यासाठी एक उद्यापन करण्यात येणार, असे देखील या महिलेच्या कुंटुबाने सांगितले. हे व्रत करणाऱ्या वृद्ध महिलेचे नाव उर्मिला चतुर्वेदी असून त्याच्या मुलाने असे सांगितले की, गेले २७ वर्ष ही महिला फक्त फळं आणि दूधच आहारात घेत होती. राम मंदिराच्या निकालाकरता या महिलेने असे व्रत केल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

दूध आणि फळं फक्त खायची ही वृद्ध महिला

ही महिला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खूप आनंदी होती. ही महिला प्रभु श्रीरामाची भक्त आहे. राम मंदिर उभारण्यात यावे याकरिता ही महिला आतुरतेने वाट पाहत आहे. या महिलेने केलेल्या व्रताचे कौतुक सोशल मीडियावर केले जात होते.

- Advertisement -

रामलल्लाच्या दर्शनानंतर सोडणार उपवास

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पाचही न्यायाधीशांचे मनापासून धन्यवाद उर्मिला चतुर्वेदी या महिलेने केले. अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेतल्यानंतर हे व्रत सोडणार अशी इच्छा या महिलेची आहे.


अयोध्या निकालानंतर जगात टॉप ५ ट्रेंडिंगमध्ये होते ‘हे’ हॅशटॅग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -