घरमुंबईटीबी रुग्णांना केली जाणार पुस्तक दान

टीबी रुग्णांना केली जाणार पुस्तक दान

Subscribe

टीबी रुग्णांसाठी सुरु केलेला नविन उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत टीबी रुग्णांना मोफत पुस्तके वाटण्यात येतील.

टीबी रोगाच्या नावाने आजही लोक घाबरतात. मग, ज्यांना हा आजार होतो त्यांच्यासाठी तर परिस्थिती कठीण आहे. टीबी झालेल्या रुग्णांना त्यांचे नातेवाईक सोडून जात असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशावेळी हे रुग्ण आपल्या आजारासोबत तसेच रुग्णालयात खितपत पडतात. त्यांचा थोडातरी विरंगुळा व्हावा यासाठी टीबी रुग्णालय प्रशासनाकडून उपक्रम राबवले जातात. रुग्णांचं मन रमावं, त्यांना मानसिक आधार मिळावा आणि पुस्तकातून जगाची माहिती मिळावी यासाठी शिवडी टीबी रुग्णालयातर्फे पुस्तक दान मोहिम सुरू करण्यात आली आहे. शिवाय, फेसबुकवरुनही या पुस्तक दान मोहिमेसाठी आवाहन करण्यात आलं आहे. जेणेकरुन हे रुग्ण दु:ख विसरून पुस्तकांच्या दुनियेत रमू शकतील.

‘Donate book for TB patients’ असं या मोहिमेचं नाव आहे. या मोहिमेद्वारे ‘ग्रंथ तुमच्या दारी’- कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने आतापर्यंत १२५ पुस्तक दान करण्यात आली आहेत. शिवाय, या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं टीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललीतकुमार आनंदे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

“टीबी रुग्णांना थोडासा मानसिक आधार मिळावा यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यानुसार पुस्तक दान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई बाहेरुनही या पुस्तक दान मोहिमेला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत एकूण १२५ पुस्तक दान करण्यात आली आहेत. वर्षभरात आणखी पुस्तक दान झाली की एक लायब्ररी तयार केली जाईल. ज्यात ज्यांनी ज्यांनी पुस्तक दान केली त्यांच्या नावासह ते पुस्तक त्या लायब्ररीत ठेवलं जाईल. त्यासाठी लोकांना रुग्णालयात येऊन पुस्तक द्यावी लागणार आहेत. शिवाय, रुग्णालयाला संपर्क केला तरी पुस्तक स्विकारली जाणार आहेत.”- डॉ. ललितकुमार आनंदे, वैद्यकीय अधीक्षक, टीबी रुग्णालय

तसंच पवईच्या आयआयटी संस्थेतील काही तरुण विद्यार्थींनींनी रुग्णालयाला पुस्तक दान केली आहेत. या मोहिमेतंर्गत फक्त पुस्तकंच नाहीतर बालकथा, कांदबरी, कविता, वैज्ञानिक माहिती, आत्मकथा, ललित लेख, ऐतिहासिक खेळ अशा विविध विषयांची पुस्तकं दान करू शकतात. तर, बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाचता येतील अशी मराठी, इंग्रजी आणि हिंदी पुस्तकंही लोकं दान करु शकणार आहे, असं डॉ. आनंदे यांनी स्पष्ट केलं आहे.टीबी रुग्णांसाठी सुरु केलेला नविन उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत टीबी रुग्णांना मोफत पुस्तके वाटण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -