घरमुंबईगृहिणीकडून टिकटॉक बंदीसाठी हायकोर्टात याचिका दाखल

गृहिणीकडून टिकटॉक बंदीसाठी हायकोर्टात याचिका दाखल

Subscribe

याचिका दाखल करताना हिना या गृहिणीने टिकटॉकचा वापर केल्याने मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा केला आहे.

असंख्य तरूणवर्गाला वेड लावणारं टिकटॉक अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दाखल करणारी महिला मुंबईतील असून तिचे नाव हिना दरवेश असे नाव आहे. सदर याचिका दाखल करताना हिना या गृहिणीने टिकटॉकचा वापर केल्याने मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा केला आहे. यासह या अॅपमध्ये अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो.

या अॅपच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन होण्यास हे अॅप कारणीभूत ठरत आहे. तसेच, व्यंगात्मक व्हिडिओमुळे तरूणाईंमध्ये आत्माहत्येचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसत आहे, असे या याचिका दाखल करणाऱ्या महिलेने याचिकेत म्हटले आहे. टिकटॉकवर असणाऱ्या काही ठराविक व्हिडिओमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होत आहे. यामुळे याचा परिणाम देशाचा विकासावर देखील होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई हायकोर्ट या याचिकेसंदर्भात कोणता निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. हिना दरवेश या गृहिणीने अॅड. अली काशिफ खान यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणाच्या शक्यता आहे.


Video: धक्कादायक! व्हिडिओ शूटिंगच्या नादात मित्रालाच गमावले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -