घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांचे कोट्यवधी लुटणाऱ्या आडत्यांना हिसका

शेतकऱ्यांचे कोट्यवधी लुटणाऱ्या आडत्यांना हिसका

Subscribe

पुणे बाजार समितीने बजावली नोटीस

डाळींब उत्पादक शेतकऱ्यांकडून नियमबाह्य काेट्यावधी रुपये वसुल करणाऱ्या चार आडतदारांना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नाेटीस बजावली आहे. त्यांनी शेतकऱ्यांकडून हमाली तोलाईची सुमारे १२ काेटी २२ लाख १३ हजार रुपये इतकी अतरिक्त वसुली केल्याचे आढळून आले आहे. त्यांना दंडासह ३० कोटी ५५ लाख ३३ हजार ८३५ रुपयांच्या वसुली करण्याची नाेटीस समितीने बजावली आहे. भाजीपाला विभागातील ५० आडत्यांची दफ्तर तपासणी सुरू असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.

बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. देशमुख म्हणाले,‘‘डाळिंब विभागातील चार आडत्यांकडुन १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यान नियमबाह्य हमाली तोलाई वसुलीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यानुसार संबधित आडत्यांची दोन वर्षांची दफ्तरे ताब्यात घेतली होती. या दफ्तरातील सर्व हिशोब पट्ट्या तपासण्यात आल्या. यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार संबधित आडत्यांवरील वसूलपात्र रक्कम निश्‍चित करण्यात आल्या आहेत. याबाबतची नोटीस संबधित आडत्यांना देण्यात आली असून, १५ दिवसांत खुलासा किंवा समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांचे परवाने रद्द करुन, मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.‘‘

- Advertisement -

या चार आडत्यांनी शेतकऱ्यांकडून सुमारे १२ काेटी २२ लाख १३ हजार रुपये इतकी जास्त वसुली केल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर समितीच्या नियमानुसार दिडपट दंड आकारुन एकूण ३० काेटी ५५ लाक ३३ हजार रुपये वसुल केले जाणार आहेत. अशाप्रकारचे आणखी भाजीपाला आणि फळ विभागातील ५० आडत्यांची दफ्तर तपासणी सुरु असून, यामध्ये सेस चुकविणे, नियमबाह्य हमाली तोलाई, लेव्ही वसुल करण्याचे प्रकार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

एक प्रतिक्रिया

  1. मार्केट यार्ड अडत्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सरकारने कारवाई केली पाहिजे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -