घरलाईफस्टाईलथंडीत 'हे' पदार्थ खा

थंडीत ‘हे’ पदार्थ खा

Subscribe

हिवाळा या ऋतूमध्ये होणाऱ्या विकारांना दूर ठेवणारे, नैसर्गिकरीत्या सहज मिळणारे व शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ जरूर खावेत. त्यातील काही निवडक पदार्थ तुमच्यासाठी देत आहोत.

गाजर :

हिवाळ्यात मूळव्याधीची प्रवृत्ती वाढते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी गाजर आहारात असलेले चांगले. गाजरात तंतुमय पदार्थ भरपूर असतात. गाजर अग्निदीपन करणारे म्हणजेच भूक वाढवणारे असून ते पोटात तयार होणारी आम्लताही कमी करते. या ऋतूत लालबुंद गाजर बाजारात सर्वत्र सहज उपलब्ध असते.

- Advertisement -

चवीला गोड, मधुर असणारे गाजर उष्ण तर असतेच शिवाय चांगले पोषण सुद्धा करतं. गाजरमध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे हिवाळ्यात आहारात गाजराचा समावेश नक्की करावा. तुम्ही गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे सुद्धा खाऊ शकता. याशिवाय गाजराचा हलवा किंवा गाजराचा घरच्याघरी रस काढून तो प्यावा. लहान मुलांचे वजन वाढवण्यात गाजर फायदेशीर ठरतं.

बार्ली / जव :

थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरु होतो. अशा आजारांवर मात करण्यासाठी किंवा त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करावा.

- Advertisement -

या दिवसात अनेकांना शरीर व स्नायू आखडण्याचा त्राससुद्धा होतो. त्यावरही जव आहारात असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो. जवात ‘ब’ जीवनसत्त्व व आवश्यक अमिनो आम्ले भरपूर असून ते पौष्टिक आहे. जव हे बलकारी, गुरू व मधुर रसात्मक आहे.

बोरे :

गाजराप्रमाणेच हिवाळ्यात बोरे देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आंबट, गोड बोरं पचायला जड असली तरी आव पडण्याच्या किंवा आमांशाच्या त्रासावर बोरे गुणकारी ठरतात.

त्याचप्रमाणे बोरे अग्निदीपन करणारी असून ती पित्त व कफ कमी करणारी व सारकदेखील आहेत. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी बोरे मदत करतात. लहान मुलांसाठी बोरे उत्तम टॉनिकसारखे काम करतात. त्यात मेंदू व मज्जातंतूंचे टॉनिक असल्यासारखे घटक आहेत.

लसूण :

लसणीत कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. त्वचेखालच्या लहान रक्तवाहिन्यांचे विस्तारण करून शरीराला उबदार वाटण्याचा अनुभव देणारा लसूण आहे. तेव्हा थंडीच्या दिवसात विविध सुप्समध्ये लसणीचा अवश्य वापर करावा. त्याचप्रमाणे रोज एक लसूण पाकळी कच्चीच चावून खाल्ली तरी ती आरोग्यदायी ठरते.

एक कप पाण्यात लसणीची एक पाकळी किंचित ठेचून घाला व पाणी उकळवून अर्धा कप होईपर्यंत आटवा. असा काढा गाळून दिवसात एकदाच कोमट असताना घेता येतो. अनेक स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होतो. अशा तक्रारींमध्ये जंतुघ्न असलेला लसूण आहारात ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -