घरक्रीडानिलांश चिपळूणकरला जेतेपद

निलांश चिपळूणकरला जेतेपद

Subscribe

राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धा

क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले एकेरीतील विविध गटांत मुंबईचा निलांश चिपळूणकर (१४ वर्षांखालील), अमिन अख्तर अहमद (१७ वर्षांखालील) आणि प्रथम करिहार (१९ वर्षांखालील) यांनी जेतेपद पटकावले.

१४ वर्षांखालील मुले एकेरीच्या अंतिम लढतीत मुंबईच्या निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा ४-२५, २५-४, २५-८ असा पराभव करुन अजिंक्यपद मिळवले. त्याआधी उपांत्य फेरीत खेतवाडीच्या वनिता विश्राम हायस्कूलचा विद्यार्थी असणार्‍या निलांशने नाशिकच्या आयान पिरजादेवर २५-१, २५-११ अशी, तर मिहीरने अमरावतीच्या सुरज गायकवाडवर १०-२५, २५-११, २५-२२ अशी मात केली होती.

- Advertisement -

१७ वर्षांखालील मुले एकेरीच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या अमीन अख्तर अहमदने मुंबईच्या निरज कांबळेचा २५-१२, २५-७ असा पराभव केला. तसेच १९ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत नागपूरच्या प्रथम करिहारने मुंबईच्या जयेश जाधववर २५-१९, २५-२० असा विजय मिळवला. या स्पर्धेतील विजेते तामिळनाडू येथे होणार्या शालेय राष्ट्रीय कॅरम स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -