घरमहाराष्ट्रजुगलबंदी आणि चिमटे...थेट विधानसभेतून

जुगलबंदी आणि चिमटे…थेट विधानसभेतून

Subscribe

सत्तास्थापनेचा तिढा सुटल्यानंतर सर्व पक्षांचे आमदार विधानभवनात दाखल झाले.देशाची संसद किंवा राज्याची विधानसभा किंबहुना महाराष्ट्रात विधानभवनात खेळीमेळीचे वातावरण असते. रविवारी देखील या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.

एकदा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले की डाव्याबाजूने ऐकू येत नाही

विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूने ऐकायला येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना टोला लगावला. तसेच या खुर्चीवर बसणार्‍या व्यक्तीला सर्व समान दिसले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाना पटोले यांची ठाकरे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर पाटील बोलत होते.

काल विरोधी पक्षाचे जेवढ डॅमेज झाले ते आज त्यांनी भरुन काढले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बागडे साहेबांनी आम्हाला पाच वर्षे कायम प्रमाने वागणूक दिली. मात्र, या खुर्चीचा एक गुण आहे की एकदा त्या खुर्चीवर बसले की डाव्या बाजूने ऐकायला येत नाही. पण अध्यक्षांनी डाव्या बाजूला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सभागृहात २८८ सदस्य असतात त्या प्रत्येकाला बोलायच असते, त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळायला हवी, अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

लोकसभेला निवडून गेल्यानंतरही आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीत, त्यामुळे आपण पदाचा राजीनामा दिला हे आपले वैशिष्ट आहे. मात्र, आता इथे तुम्हाला अस करता येणार नाही. पण शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम आपण खूप चांगल्या प्रकारे करु शकता. एका शेतकरी नेत्याची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मला खात्री आहे की ते सभागृहाला न्याय देतील आपल्याला चांगले मार्गदर्शन करतील अशी आशा आहे,असे नाना पटोलेंचे अभिनंदन करताना जयंत पाटील म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या अपेक्षेप्रमाणे वागाल

- Advertisement -

सभागृहात शांतता राहिली पाहिजे. वेलच्या जवळ जाणे योग्य नाही सभात्याग करायचाच असेल तर शिस्त पाळत कालच्याप्रमाणे बाहेर निघून गेलात तरी चालेल. वॉक आऊट करायच्या प्रथा ज्या आहेत त्या देखील आपण गटनेत्यांसोबत बसून ठरवल्या पाहिजेत, अशी अपेक्षा करताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानाचा दाखला दिला. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आणिबाणीपासून मला डाव्या कानाने ऐकू येत नाही – जयंत पाटलांनी बागडेंचे प्रत्युत्तर

सभागृहातील काहींनी तुम्हाला डावीकडून ऐकायचे, उजवीकडून ऐकायचे, डावीकडे पाहायचे, उजवीकडे पाहायचे असे सांगितले. मात्र माझ्या ऐकण्याची अडचण आजची नाही. ते व्यंग आणीबाणीतील आहे आणि त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्यावेळी माझ्याकडे सत्याग्रह करण्याचे काम होतं. त्यामुळे मी दिवस-रात्र हिंडायचो. प्रचंड थंडीतून प्रवास करायचो. त्या थंडीत हातपाय बधीर व्हायचे. त्याचा परिणाम शरीरावर झाला. मी बेशुद्ध पडलो. पण २-३ दिवस डॉक्टरकडे गेलो नाही. तेव्हा मला ऐकू यायचे नाही. या घटनेला आता ४५ वर्षे झाली. काहींना हे माहीत नसेल, म्हणून आज मी हे सांगतो आहे. तुम्ही त्यावेळी कुठे होतात सांगू का? पण ते आज मी सांगणार नाही,असे म्हणत हरिभाऊ बागडे यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देत टोला लगावला.

मला माझ्या व्यंगाचे दु:ख वाटत नाही. तर अभिमानच वाटतो, अशा शब्दांत विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ देत जयंत पाटील यांना टोला लगावला. आणीबाणीला आम्ही कडाडून विरोध केला होता. त्यावेळी मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र त्याची मी तक्रार करत नाही. उलट त्यावेळी झालेल्या त्रासामुळे आलेल्या शारीरिक व्यंगाचा मला सार्थ अभिमान वाटतो, असे बागडे म्हणाले. यावेळी त्यांनी तुम्ही आणीबाणीवेळी नेमके कुठे होतात, असा सवाल बागडे यांनी विचारला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते हरिभाऊ बागडेंनी विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नाना पटोलेंचे अभिनंदन केले. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांनी आपली बाजू जास्त ऐकून घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर भाष्य करताना बागडेंनी आणीबाणीचा संदर्भ दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -