घरमुंबईकसोटीच्या क्षणी प्रमुखस्वामी यांनी मनोबल वाढवले, प्रेरणा दिली - अमित शहा

कसोटीच्या क्षणी प्रमुखस्वामी यांनी मनोबल वाढवले, प्रेरणा दिली – अमित शहा

Subscribe

संन्यासी आणि साधूंच्या जीवनाप्रती लोकांच्या मनात श्रद्धाभाव तयार करण्याचे सर्वात उल्लेखनीय कार्य प्रमुखस्वामी यांनी केले आहे. प्रमुखस्वामी यांनी आपल्या संन्यासी जीवनात निःशब्द राहून संन्यासी जीवनाची गाथा जगात पोहोचवली. त्यांनी निःस्वार्थ भावनेने केलेले हे महत्तम कार्य पुढील अनेक शतके मानव जीवनाच्या उद्धारासाठी सहाय्यभूत राहणार आहे. धर्माचा मर्म सांगण्याचे काम प्रमुखस्वामी यांनी केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. नेरूळ इथल्या डी. वाय. पाटील स्टेडियमध्ये गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वामी नारायण यांच्या अध्यात्मिक परंपरेतील पाचवे आध्यात्मिक उत्तराधिकारी प्रमुखस्वामी यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त विशेष सोहळा नेरुळ येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. डी. वाय. पाटील आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. माझ्या व्यक्तिगत जीवनात अनेक चढ उतार आले आहेत. त्या प्रत्येक कसोटीच्या क्षणी प्रमुखस्वामी यांनी माझं मनोबल वाढवले आणि मला प्रेरणा दिल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -