घरमहाराष्ट्रकोरेगाव भीमा विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अभिवादन

कोरेगाव भीमा विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अभिवादन

Subscribe

कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले.

आज कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा पार पडत आहे. आजचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला अभिवाद केलं. कोणीही अफवा पसरवू नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी जनतेला केले. आज कोरेगाव भीमा मधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अनेक मोठे नेते याठिकाणी येऊन विजयस्तंभाला मानवंदना देणार आहेत. यामध्ये नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

दरम्यान २०१८ रोजी या दिवशी सोहळ्यामध्ये अनुचित प्रकार घडला होता. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. त्यानुसार ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट पसरवणाऱ्यांवर देखील पोलिसांचे लक्ष आहे. सोशल मीडियावरून असे कृत्य करणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी २५० हून अधिक व्हॉटसअॅप ग्रुपच्या अॅडमिनला याआधीच नोटिस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होत आहे. यावेळी नेतेमंडळींसह आमदार आणि खासदार सुद्धा दिवसभर हजेरी लावणार आहेत. त्यामुळे कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -