घरक्रीडाश्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बंदी

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बंदी

Subscribe

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल आणि कोच चंडीका हथरुसिंघे यांच्यासह संघ व्यवस्थापक अशनका गुरुसिन्हा यांच्यावर वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यातील गैरप्रकारामुळे त्यांच्यावर आयसीसीने ४ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांत खेळण्यापासून बंदी घातली आहे.

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षकाकडून करण्यात आलेल्या गैरप्रकारामुळे आयसीसीने जबरदस्त कारवाई करत २ वन-डे आणि १ कसोटीची बंदी घातली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी दरम्यान बॉल टॅम्परिंग आणि चिडून खेळल्याच्या आरोपांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

नक्की काय घडले ?

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. ज्यातील सेंट लुशिया येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चंडीमलवर बॉल टेम्परिंगचा आरोप लावण्यात आला होता. मात्र या प्रकारला न जुमानता श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे सामना दोन तास उशीराने सुरू झाला. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून ज्याची पंचांनी वेस्ट इंडिजच्या संघाला ५ धावा देण्यात आल्या आणि संपूर्ण सुनावणीनंतर कर्णधार दिनेश चंडीमल आणि कोच चंडीका हथरुसिंघे यांच्यासह संघ व्यवस्थापक अशनका गुरुसिन्हा यांच्यावर ४ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांची बंदी घातली गेली.

आयसीसीकडून नेमण्यात आलेल्या एका समितीने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिच यांनी या तिंघावर कारवाई केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -