घरताज्या घडामोडीतो व्हिडिओ व्हायरल करु नका - सुप्रिया सुळे

तो व्हिडिओ व्हायरल करु नका – सुप्रिया सुळे

Subscribe

जालना जिल्ह्यात गोंदेगाव येथे एका मुलीचा विनयभंग करुन काही टवाळखोरांनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या टवाळखोरांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. टवाळखोरांना शिक्षा झालीच पाहीजे, मात्र त्यासाठी तो व्हिडिओ व्हायरल करु नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

दोन ते तीन दिवसांपुर्वीचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. आज सर्व वाहिन्यांवर याची बातमी लागल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचे समजले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुकद्वारे हा व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, “जालन्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की, शेवटी ती एक मुलगी आहे. कुणाची तरी बहिण आहे. सोशल मीडियावर अशा गोष्टी आल्यावर त्याचा निषेधच करायला हवा. मात्र हा व्हिडिओ व्हायरल करायला नको. तिच्या खासगी आयुष्याचा आपण मान राखायला हवा. हा व्हिडिओ व्हायरल होता कामा नये.”

- Advertisement -

यावेळी सुप्रिया सुळे यांनी गृहविभागाला देखील कडक करावाई करण्याची विनंती केली. “मुलीला मारहाण करणारे आणि व्हिडिओ काढणाऱ्या मुलांवर कडक करावाई करावी. अशाप्रकारचे मॉरल पोलिसिंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही.”, असेही त्या म्हणाल्या. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत आतीश खंदारे, सुशील वाघ, कारभारी वाघ अशी आरोपींची नावे आहेत. तर रेकॉर्डिंग करणारा आरोपी अल्पवयीन आहे. यापैकी दोघांना अटक झाली असून इतर दोघांचा शोध सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -