घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात वापरा हा 'फेसपॅक'

उन्हाळ्यात वापरा हा ‘फेसपॅक’

Subscribe

उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर या फेसपॅकचा नक्कीच वापर करा.

सध्या आता थंडी कमी झाली असून उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. मात्र, या उन्हामुळे बऱ्याचदा त्वचा काळी पडते. अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास त्वचा उजळम्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कोणता फेसपॅक वापरावा.

जेष्ठमधाची मुळे ही उन्हात काळ्या झालेल्या त्वचेचे रक्षण करते. हा फेसपॅक वापरल्याने रंग देखील उजळण्यास मदत होते. तसेच लिंबू त्वचेचा रंग उजळवून त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी करतो. विशेष म्हणजे त्वचेच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी लिंबू आणि जेष्ठमधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नियमितपणे याचा वापर केल्यास सौंदर्यात वाढ देखील होते.

- Advertisement -

असा तयार करा फेसपॅक

चमचे जेष्ठमध पावडर आणि चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वाळू द्या. नंतर ३० मिनिटाने गार पाण्याने चेहरा धुऊन घ्या. यामुळे चेहरा उजळण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -