घरताज्या घडामोडीमुंबईतील बारसह दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपचा विरोध

मुंबईतील बारसह दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपचा विरोध

Subscribe

मुंबईतील रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे.

मुंबईतील रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. दुकान आणि विविध आस्थापना यांना परवाना (लायसन्स) देण्यात येणार्‍या महापालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करून देवदेवतांची नावे रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुची दुकाने यांना देण्यात येऊ नये, याकरता नियमात बदल करावा आणि अशाप्रकारे देण्यात आलेल्या देवदेवतांच्या नावांच्या पाट्या काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे.

देवदेवतांच्या नावांचे नामफलक काढण्याची मागणी

भाजपचे जोगेश्वरी पूर्व येथील नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली आहे. या ठरावाच्या सूचनेमध्ये यादव यांनी रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुच्या दुकानांना देण्यात आलेल्या देवदेवतांच्या नावाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेच्या दुकान आणि आस्थापना विभागाच्यावतीने अधिनिमातील तरतुदीनुसार मुंबईतील दुकान आणि विविध आस्थापना यांना परवाना (लायसन्स) दिला जातो. परंतु, हा परवाना देताना दुकान अथवा आस्थापना यांचा नामफलक कोणत्या भाषेत असावा, किती आकाराचा असावा, मराठी भाषेचा वापर किती असावा आदींच्या नियमांच्या अधीन राहूनच ही परवानगी दिली जाते. परंतु, मराठी नामफलकांचा मुद्दा हा सध्या न्यायप्रविष्ठ आहे. पण दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्यांसदर्भातच महापालिकेला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. परंतु, मुंबई असे काही रेस्ट्रोबार तसेच पब,ऑक्रेस्टा, डान्स बार तसेच दारुची दुकाने आहे, ज्यांच्या नामफलकांवर देवदेवतांची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रत्येक धर्मात देवदेवता या पुजनीय आहे. देवदेवतांच्याप्रती भाविकांमध्ये श्रध्दा भावना आहेत. प्रत्येक जण कोणत्या ना देवतेचे श्रध्देने पुजन करत असतात. त्यामुळे एखाद्या रेस्ट्रोबारला तसेच ऑक्रेस्टा, डिस्को डान्सबारसह दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे दिल्यास भक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. यामुळे धार्मिक वादही निर्माण होवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कोणत्याही रेस्ट्रोबार, पब, ऑक्रेस्टा,डिस्को डान्सबारसह दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्याची प्रथा बंद करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी दुकाने आणि आस्थापनाच्या अधिनियमांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – धक्कादायक! महिलेला जिवंत जाळताना आली दुर्गंधी आणि…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -