घरताज्या घडामोडीजो झोपडीत राहणार त्यालाच मिळणार घराची मालकी - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

जो झोपडीत राहणार त्यालाच मिळणार घराची मालकी – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Subscribe

मुंबई शहर झोपडीमुक्त करण्याच्या उद्दिष्टाने गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी एक नवीन घोषणा आज केली. जी व्यक्ती झोपड्यांमध्ये राहते त्याच व्यक्तीला घराची मालकी मिळणार असे आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राहील त्याचे घर अशा पद्धतीने झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांसाठीचा दिलासा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गृहनिर्माण मंत्री झाल्यापासून ३० दिवसांत घेतलेल्या निर्णयाचा आढावा त्यांनी पत्रकार परिषदेत घेतला.

अनेक झोपडपट्ट्यांमध्ये लोकांनी आपले घर भाड्याने दिले आहे. पण पुर्नविकास प्रकल्पात अनेक भाडेकरू आपल्या झोपडीच्या घराचा लाभ घेण्यासाठी परत येतात. पण यापुढे जो भाडेकरू झोपडीत राहत असेल त्याच्याच मालकीचे घर मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली. झोपडपट्टीतून इमारतीत जाऊन राहणाऱ्यांचे राहणीमान उंचावल्यानेच ते ही झोपडी भाड्याने देतात. त्यामुळे झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीचा पुर्नविकासात कोणताही फायदा होत नाही. म्हणूनच झोपडीत राहणारे भाडेकरूही पुर्नवसनाच्या योजनेत समाविष्ठ करण्यात यावे असा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

झोपडपट्ट्यांचे होणार ड्रोन सर्वेक्षण

मुंबईतील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण झाले की लगेचच झोपड्यांची संख्या वाढते. पण ही संख्या मर्यादित ठेवण्यासाठी आता झोपड्यांचे सर्वेक्षण ड्रोनचा वापर करून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. झोपड्यांची संख्या आणखी वाढू नये म्हणूनच ड्रोनच्या माध्यमातून हे झोपड्यांची संख्या फ्रीज कऱण्यात येईल. त्यामुळे अतिरिक्त वाढणाऱ्या झोपड्या या डिजिटल मॅपच्या माध्यमातून लगेचच लक्षात येईल. झोपडी परिसराची एक निश्चित सीमा आखणे ड्रोनच्या सर्वेक्षणामुळेच शक्य होईल. ड्रोन सर्वेक्षण झालेल्या परिसरात झोपड्या वाढू नये यासाठी महापालिकेचा वॉर्ड ऑफिसर तसेच पोलिस निरीक्षक यांचीही देखरेख असणार आहे. या व्यक्तींकडेही वाढणाऱ्या अनधिकृत झोपडीबाबतची तक्रार करता येईल असे त्यांनी सांगितले.

Live गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 6, 2020

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -