घरट्रेंडिंगमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसने माफी मागावी - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मित्रपक्ष काँग्रेसने माफी मागावी – देवेंद्र फडणवीस

Subscribe

काँग्रेसनं राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे हा अपमान सहन करणार असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मध्य प्रदेश सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी भाजपा आता आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारने माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय, काँग्रेसच्या शिदोरी या मासिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावकरांवर गलिच्छ लेख हा लिहिल्याप्रकरणामध्ये शिदोरी मासिकावर बंदी घालावी अशी ही मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही –

शिवसेनेचा मित्रपक्ष काँग्रेसने महापुरुषांचा अपमान करण्याची मालिका सुरू केली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे. मध्य प्रदेशमधल्या छिंदवाड्यामध्ये आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाताहत आणि विटंबणा करण्यात आली. त्याचा भारतातील प्रत्येक व्यक्ती निषेध करतो आहे’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने माफी मागावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारावा. शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याच्या मालिकेचे सत्र सुरुच ठेवले आहे. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यामुळे, मध्यप्रदेश सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण सन्मानाने महाराजांचं पुतळा बसवला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार?- देवेंद्र फडणवीस

सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. छिंदवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी मराहाजांचा पुतळा हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला. त्यानंतर, काँग्रेसने शिदोरी या मुखपत्रात वीर सावरकर यांचा अपमान केला. हे सगळं शिवसेनेला चालतं का? वीर सावरकर यांचा अपमान भाजपा कधीही सहन करणार नाही असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच, सत्तेसाठी शिवसेना किती लाचारी पत्करणार आहे असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

- Advertisement -

शिदोरी मासिकावर बंदीची मागणी –

“काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ मध्ये वीर सावरकर यांच्याबाबत गलिच्छ लिखाण करण्यात आलं आहे. ज्याप्रकारे मध्यप्रदेशात काँग्रेसने गलिच्छ लिखाण केलं अगदी तसाच प्रकार शिदोरीमध्ये छापण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या अभ्यासाचे वावडे असलेल्या शिवसेनेला ते तितकेच प्रिय आहे असा उल्लेख केला आहे. हेदेखील शिवसेनेला मान्य आहे का? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला काँग्रेसने केलेलं लिखाण मान्य आहे का?. ‘स्वातंत्र्यवीर नव्हे माफीवीर’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवसेनेला हा अँगल मान्य आहे का? उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का?” असेही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.

सावरकरांबद्दलची मांडणी वस्तुस्थितीला धरूनच –

शिदोरीच्या अंकात सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरूनच आहे. त्यामुळे, शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा त्यांचा द्वेष किंवा बदनामी करण्यासाठी नाही. सावरकरांबद्दल काँग्रेसला व्यक्तिद्वेष नाही. त्यांच्या विचारांना आमचा विरोध आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -