घरक्रीडाहिंदुजा, मुंबई बंदरचा विजय

हिंदुजा, मुंबई बंदरचा विजय

Subscribe

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कबड्डी

हिंदुजा रुग्णालय, मुंबई बंदर या संघांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित रौप्यमहोत्सवी शहरी पुरुष व्यावसायिक गटाच्या कबड्डी स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली. शहरी पुरुष व्यावसायिक अ गटात गतविजेत्या मुंबई बंदर संघाने टीम ग्लोबलचा ४४-१८ असा पराभव केला. या सामन्याच्या मध्यंतराला मुंबई बंदरकडे २३-८ अशी भक्कम आघाडी होती. उत्तरार्धातही त्यांनी चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना २६ गुणांच्या फरकाने जिंकला.

फ गटात हिंदुजाने भारतीय आयुर्विमावर ३४-२६ अशी मात केली. पहिल्या डावात हिंदुजाचा संघ १२-१३ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, जितू बागडे, वैभव शिंदे, केतन पवार यांच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर हिंदुजाने दमदार पुनरागमन करत हा सामना जिंकला. क गटात न्यू इंडिया एशोरन्स संघाने सिमेन्सचा ३७-७ असा धुव्वा उडवला. केतन कळवनकर, अभिषेक रामाणे, निलेश पवार यांच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

- Advertisement -

स्नेहविकासविरुद्ध चंद्रोदय पराभूत!
शहरी महिलांच्या पहिल्या फेरीत भांडुपच्या स्नेहविकासने प्रभादेवीच्या चंद्रोदयचा ४२-३४ असा पराभव केला. सोनाली पाटील, रिया तावडे स्नेहविकासकडून, तर निकिता खैरे, वृषाली पाटील चंद्रोदयकडून चांगल्या खेळल्या. तसेच महात्मा फुले संघाने मुंबईच्या व्ही.के.बी. स्मृतीचा ६७-२० असा धुव्वा उडवला. नवी मुंबईच्या राजश्री शाहू महाराज संघाने चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या होतकरूचा १९-१५ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -