घरलाईफस्टाईलडायफ्रूट्सचे 'हे' आहेत लाभदायक फायदे

डायफ्रूट्सचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे

Subscribe

जाणून घ्या डायफ्रूट्सचे अनोखे फायदे

डायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स, कॅल्शियम आणि अनस्यच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात. यामुळे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्याचा चांगला फायदा होतो.

बदाम

- Advertisement -

बदाम रक्तात ग्लूकोज लेवल मॅनेज लेवल करायला मदत करतो. त्यासोबतच स्ट्रेस कमी करायला पण मदत होते. त्यामुळे कच्चा बदाम खाणे चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच बदाम रात्रभर भिजत ठेवल्यास उत्तम.

अक्रोड

- Advertisement -

अक्रोडमध्ये जास्त कॅलरीज असतात. थोडेसे अक्रोड खाऊनही तुम्ही खूप वेळा उपाशी राहू शकता. यामुळे तुम्हाला थोड्या – थोड्या वेळात काही खाण्याची आवश्यकता भासणार नाही आणि यामुळे शुगर देखील कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.

काजू

काजूमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन – ई असतात. त्यामुळे काजूचे सेवन केल्याने त्वचा चांगली राहते आणि आपण अधिक तरुण दिसतो.

पिस्ता

पिस्तामध्ये खूप एनर्जी असते. यात खूप प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात. रिसर्चनुसार पिस्ता मधुमेह – ब्लड शुगर मेनटेन करायलाही मदत होते. खारे पिस्ता खाण्याचे टाळा. रोज फ्रूट सॅलेडसोबत जास्त पिस्ता खा. त्याचा अधिक फायदा होतो.

मनुके

आंबट गोड चव असणारे आणि लहान आकाराचे मनुके आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात हे फारसे अनेकांना माहित नसते. ड्रायफ्रूटमधील मनुके बऱ्याच आजारांवरील रामबाण उपाय देखील ठरतात. लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर मनुके खाणे हे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीरात अगदी सहजरित्या पचते. दररोज मनुके खाल्ल्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -