घरताज्या घडामोडीमुंबईतली ४ प्रसिद्ध हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी!

मुंबईतली ४ प्रसिद्ध हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी!

Subscribe

मुंबईतल्या चार मोठ्या हॉटेलांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

एकीकडे २६/११च्या दहशतवादी मुंबई हल्ल्यासंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात खळबळजनक खुलासे केलेले असतानाच आता मुंबईतल्या ४ मोठ्या हॉटेल्सला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. विशेष म्हणजे १०० बिटकॉईन्स म्हणजेच भारतीय चलनामध्ये ७ कोटी रुपयांच्या आसपासची रक्कम थेट वॉलेटमध्ये जमा करण्याची मागणी या धमकीमध्ये करण्यात आली आहे. विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सेव्हन इलेव्हन स्क्वेअर हॉटेलच्या ऑनलाईन फीडबॅक फॉर्ममध्ये ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

सर्च ऑपरेशन सुरू

लीला हॉटेल, सहारा स्टार, सी प्रिन्सेस आणि द पार्क अशी या ४ मोठ्या हॉटेलांची नावं आहेत. पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही धमकी आली असून त्यासंदर्भात सेव्हन इलेव्हन हॉटेलने लागलीच पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे त्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या चारही हॉटेलांमध्ये आणि आसपासच्या परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी हे स्वत: या तपासावर लक्ष ठेऊन आहेत.

- Advertisement -

दरम्यान, लष्कर-ए-तोयबाकडून ही धमकी आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्मघाती बॉम्बर तयार असून १०० बिटकॉईन्स जमा न केल्यास ही चारही हॉटेल बॉम्बने उडवून लावण्याचा उल्लेख या फीडबॅक फॉर्ममध्ये करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -