घरताज्या घडामोडीVideo: ठाकरे सरकारचा कामकाज सांगणारा खास व्हिडिओ

Video: ठाकरे सरकारचा कामकाज सांगणारा खास व्हिडिओ

Subscribe

ठाकरे सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा सांगणाऱ्या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळतं आहे.

ठाकरे सरकारला आज १०० दिवस यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत. याच निमित्ताने शिवसेनेकडून एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ठाकरे यांच्या सरकारचा कामकाज सांगितला आहे. १११ सेकंदात ठाकरे सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा सांगणारा हा व्हिडिओ आहे. शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ‘मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारचे १०० दिवस फक्त १११ सेकंदमध्ये पाहा!’ असं लिहिलं आहे. शिवसैनिकांकडून या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळतं आहे.

CM Uddhav Balasaheb Thackeray’s 100 days in 111 seconds!

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारचे १०० दिवस फक्त १११ सेकंदमध्ये पाहा! CM Uddhav Balasaheb Thackeray’s 100 days in 111 seconds! Watch??

ShivSena ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 6, 2020

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. राज्यात शिवसेनेने सत्ता स्थापन करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर शिवतिर्थावर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राजकारणातील समीकरण बदलून गेलं.

आज ठाकरे सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासहित अयोध्यदौऱ्याला निघाले आहेत. उद्धव ठाकरे दुपारी साडे चार वाजता रामलल्लांचे दर्शन घेणार आहे. त्याच्यासोबत महाराष्ट्राचे काही मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. तसंच अयोध्येत शांतता राहावी. मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छित आहे. त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शरयू तिरावर आरती करणार नाहीत. शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोना विषाणूंच्या प्रार्दुभावामुळे आरतीचा कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा – Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यासाठी रवाना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -