घरताज्या घडामोडीCoronaVirus Update: महाराष्ट्रातही आढळले २ करोना बाधित रुग्ण

CoronaVirus Update: महाराष्ट्रातही आढळले २ करोना बाधित रुग्ण

Subscribe

आज पंजाब, कर्नाटक राज्यानंतर महाराष्ट्रातही करोना व्हायरसची लागण झालेला पहिला संशयित रुग्ण आढळला आहे. पुणे शहरात दुबई येथून परतलेल्या दोन रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. नायडू हॉस्पिटलमध्ये दोन्ही रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन उपचार सुरु केले आहेत. दोघांपैकी एकाची प्रकृती स्थिर असून त्यापैकी एका रुग्णाला करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले आहे तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप करोनाची लक्षणे आढळलेली नाहीत.

- Advertisement -

सोमवारी संध्याकाळ पर्यंत देशात एकूण ४५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही दोन रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असली तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

हे वाचा – पंजाबमध्ये आढळला पहिला करोना रुग्ण; कर्नाटकातही एक पॉझिटिव्ह

- Advertisement -

होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा आणि उरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -