घरताज्या घडामोडीपुण्यात धुळवडीला गालबोट; दोन गटात राडा, गाड्यांचीही तोडफोड

पुण्यात धुळवडीला गालबोट; दोन गटात राडा, गाड्यांचीही तोडफोड

Subscribe

पुण्यात धुलवड साजरी करताना दोन गडात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांच नुकसान झालं आहे.

पुण्यात धुळवडीदरम्यान गालबोट झाल्याचं समोर आलं आहे. दोन गटात झालेल्या राड्यामध्ये तोडफोड आणि दगडफेक झाली आहे. यात सर्वात जास्त गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यातील चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडी इथली ही घटना आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या घटनेत दोन्ही गटात तुफान हाणामारी झाल्याचं दिसतंय. या मारामारीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, पोलीस याचा तपास करत आहेत.

सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये सुरुवातीला एका गटातील काही तरुणांकडून दगडफेक होते. तसेच आजूबाजूच्या गाड्यांचीही तोडफोड होते. त्यानंतर समोरील गटाचे तरुणही लाठ्याकाठ्या घेऊन येतात. ते आधीच्या गटातील तरुणांचा पाठलाग करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात काही गटांकडून दहशत पसरवण्यासाठी गाड्यांची तोडफोट केल्याचे अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता राडेबाजी झाल्याने पुण्यातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेसह पोलिसांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी खेळू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मात्र, आता अशा पद्धतीने राडेबाजी झाल्यामुळे पोलिसांच्या कामात आणखीनच भर पडली आहे.


हेही वाचा – पुण्यातले करोना रुग्ण ४० लोकांसोबत दुबईला गेले होते!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -