घरक्रीडाबीसीसीआयने घेतला करोनाचा धसका; केल्या सर्व स्पर्धा रद्द

बीसीसीआयने घेतला करोनाचा धसका; केल्या सर्व स्पर्धा रद्द

Subscribe

खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यक्रम, अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. करोनाचा धसका आता बीसीसीआयने देखील घेतला आहे. करोनाच्या धास्तीने बीसीसीआयने सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केली. खेळाडू आणि चाहत्यांचा विचार करून आम्ही सर्व स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेत आहोत, असे बीसीसीआयने सांगितले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पेटीएम एकदिवसीय मालिका करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी रणजी करंडकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला. त्यानंतर इराणी चषक आणि विजय हजारे स्पर्धा होणार होती. मात्र, सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या २६ वर, शनिवारी ९ रुग्णांची भर!


दरम्यान, देशातील सर्वात मोठी स्पर्धा आयपीएल देखील १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर आम्हाला आयपीएल रद्द करावी लागेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -