घरताज्या घडामोडीसोनं ४० हजाराच्या खाली घसरलं

सोनं ४० हजाराच्या खाली घसरलं

Subscribe

सोनं ४० हजाराच्या खाली घसरल

आज भारतात सोन्याचा दर प्रत्येक ग्रॅम मागे ४० हजार रूपयांच्या खाली आहे. करोना व्हायरसच्या परिणामामुळेच आज सोन्याची किंमत कमी होण्यावर परिणाम झाला. करोनाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या विविध देशांमधील अर्थव्यवस्थांवर असणाऱ्या दबावामुळेच हे दर घसरले आहेत.
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून पहिल्यांदाच सोन्याचे दर तब्बल ५.१ टक्के खाली घसरले. सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम मागे ३९ हजार ६५० रूपये इतका खाली आहे.

- Advertisement -

जागतिक आर्थिक बाजारपेठांमध्ये सोमवारी ब्लॅक मंडेचा अनुभव आल्यानंतर आज लगेचच दुसऱ्या दिवशी सोन्यासारख्या मौल्यवान धातुमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केल्यानंतरही सोन्याच्या किंमतीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याची किंमत सरासरी ३८ हजार ते ३९ हजार दरम्यान असू शकेल असा तज्ञांचा अंदाज आहे. याआधी शुक्रवारी प्रत्येक १० ग्रॅममागे १८०० रूपयांनी ही किंमत घसरली होती. तर गेल्या काही दिवसात ५ रूपयांनी सोन्याच्या दरात घसरण झालली आहे. सोन्याची किंमत ४४ हजार ५०० रूपयांवरून ३९ हजार 624 रूपयांवर खाली आली आहे. तर चांदीला प्रत्येक किलोसाठी ३६ हजार २८७ रूपये असा दर मिळाला आहे.

जगभरात सोन्यातील गुंतवणुक ही सुरक्षित मानली जात होती. पण करोनाच्या सावटामुळे सोन्याच्या किंमतींवरही याचा परिणाम पहायला मिळाला आहे. करोना व्हायरसच्या परिणामामुळे आता जगभरात मंदीचे वातावरण येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच जगभरातील व्याजदरांवरही याचा परिणाम पहायला मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -