घरताज्या घडामोडी'तुम्ही घाबरू नका, मी साहेबांच्या कानावर घालतो'

‘तुम्ही घाबरू नका, मी साहेबांच्या कानावर घालतो’

Subscribe

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पर्यटनासाठी उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३९ नागरिक विमानसेवा नसल्याने अडकून पडले आहेत. मायदेशी परतण्याची शक्यता दिसत नसल्याने बिथरून या पर्यटकांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना उज़्बेकिस्तान येथून व्हिडीओ कॉल केला. ‘तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या कानावर घालतो’ जयंत पाटील यांचे हे शब्द ऐकून त्या पर्यटकांना मोठा धीर आला.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सांगलीचे अॅड. अमोल चिमाण्णा यांचे बंधू व माझे मित्र अभिजित चिमाण्णा हे महाराष्ट्रातील ३९ पर्यटकांसह उज्बेकिस्तानच्या ताश्कंद येथे विमानसेवा नसल्याने अडकले आहेत. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.मायदेशी परतण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने अभिजित चिमाण्णा व सहकाऱ्यांनी काल रात्री मला ताश्कंद येथून फोन केला. महाराष्ट्रातील या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी सर्वोतोपरीने प्रयत्न करेन. प्रसंगी मा. खा. शरदचंद्र पवार साहेबांनाही केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाशी बोलण्याची विनंती करेन.Sharad Pawar#CoronaOutbreak #CoronaVirus

Jayant Patil – जयंत पाटील ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಮಾರ್ಚ್ 18, 2020

- Advertisement -

 

सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. जगभरातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. अशातच महाराष्ट्रातील जवळपास ३९ नागरिक विमानसेवा नसल्याने उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे अडकले आहेत. १० मार्च रोजी हे पर्यटक भारतातून गेले होते तर काल (१६ मार्च) हे पर्यटक मायदेशी परतणार होते मात्र ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. घाबरलेल्या या पर्यटकांनी मंत्री जयंत पाटील यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. तुम्हाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वच प्रयत्न केले जातील. तसेच शरद पवार यांना साहेबांनाही तुम्हाला परत आणण्यासाठी केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करेल असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी त्या पर्यटकांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -