घरताज्या घडामोडीजमावबंदीसह संचारबंदी असताना तरुणांची नाक्यावर रहदारी

जमावबंदीसह संचारबंदी असताना तरुणांची नाक्यावर रहदारी

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूनीवर घरातून बाहेर पडू नये आवाहन करुन देखील त्याकडे अनेक जण दुर्लश करत नाक्यावर गट करुन उभे राहत असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण परिमंडळात जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली असतानाच उनाडकी युवक या शासकीय आदेशाला न जुमानता अगदी बिनधास्त पणे रस्त्यांवर तसेच ठिक ठिकाणी नाक्यावर झुंबड करून उभे राहत असल्याचे वास्तव चित्र दररोज समोर येत आहे. करोना सारखा महामारी रोगाचा जलदगतीने प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्रातच याचा मोठा आकडा दररोज वाढू लागला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना हात जोडून “घराबाहेर पडू नका”, असे आवाहन केलेले आहे. एकीकडे पोलीस प्रशासन दररोज नागरिकांना गर्दी टाळावी म्हणून विनंती करताना दिसून येत आहे. करोना या रोगावर रामबाण औषध उपलब्ध नसल्याने शासकीय यंत्रणांनी यामुळे मोठ्या प्रमाणात याचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरसावल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे. कोरोनाची एकाला लागण झाल्याने तो १०० लोकांच्या सानिध्यात येऊन आकडा वाढत चालला आहे. कल्याण शहरात येऊन पोहोचलेला करोना कल्याण तालुक्याच्या आजूबाजूच्या गावात येण्यास वेळ लागणार नाही. अनेक ग्रामस्थांनी यामुळेच गावात येणार्‍या फेरीवाले तसेच अनोळखी इसमाना गावाच्या वेशीवरच गाव बंदी असल्याचे फलक लावून आमच्या गावात करोनाला थारा नसल्याचा एका प्रकारचा जणू संदेश दिला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम या शहरात मात्र, येथील तरुण वर्गाने करोनाला हलक्या स्वरूपात स्वीकारले असून त्यामुळे ही तरुणाई हिरोगिरी करत बाईकवर न चुकता नाक्यावर हजेरी लावत आहेत.

- Advertisement -

नागरिकांकरिता शासनाचे युद्धपातळीवर काम

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी ट्रेन, बेस्ट शासनाने बंद करून धाडसी निर्णय घेण्यास करोनाने भाग पाडले आहे. रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर या गाड्या तसेच सरकारी कार्यालयात पाच टक्के उपस्थिती, मॉल, चित्रपट गृहे, जिम आदी ठिकाणे यापूर्वीच बंद केली आहेत. करोनाचा येथे शिरकाव होऊ नये, म्हणून शासन यंत्रणा नागरिकांकरिता युद्धपातळीवर काम करीत असताना दिसून येत आहे.

मात्र, कल्याण तसेच कल्याण तालुक्यातील गावांमध्ये बाईकवर फिरणे पाच पेक्षा जास्त तरुणांची गर्दी जमविणे आजच्या स्थितीला धोक्याची घंटा असण्याची शक्यता आहे. शासनाने किराणा मालाची दुकाने, हॉस्पिटल, भाजीपाला दुकाने, मेडिकल स्टोर सुविधा, दूध वितरण सुविधा, लॉकडाऊनमध्ये वगळली आहे.

- Advertisement -

बुधवारी पंतप्रधानांनी १५ एप्रिल पर्यंत देशभरात लॉक डाऊनचा संदेश देत नागरिकांनी घराबाहेर पडू नका अशी नम्रपणे देशातील नागरिकांना विनंती केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख दररोज मीडियासमोर येऊन अत्यावश्यक काम असले तरच घराबाहेर पडा अशा विनवण्या राज्यातील नागरिकांना करताना राज्यातील नागरिकांना दिसून येत आहे. मात्र, यांच्या विनंतीला येथील युवक मान सन्मान करताना दिसून येत नाही.

कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे कठोर आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून मानले जात आहेत. पानसरे यांनी सीनियर इन्स्पेक्टर यांना आदेश देऊन जमावबंदी आणि संचारबंदीत मोकाट फिरणाऱ्या या तरुणांवर प्रसादाचा वर्षाव आणि कायदेशीर कारवाई केल्यास या ठिकाणी नाक्यावर उभी राहत असणारी संख्या झटक्यात कमी होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायुक्त विवेक पानसरे यांच्यापासून अनेक अधिकारी झटत असल्याचे दिसून येत असून येथील तरुण वर्ग जमावबंदी आणि संचार बंदीला ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. उपायुक्त पानसरे यावर नक्कीच बडगा उचलतील याबद्दल तिळमात्र शंका नाही. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्यात टिटवाळा येथे देखील आजूबाजूच्या परिसरात असाच प्रकार घडत असून त्यांनी देखील याकडे कानाडोळा करता कामा नये.


हेही वाचा – लॉकडाऊन- एटीएम बंद, घरबसल्या बँक देणार पैसे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -