घरमहाराष्ट्रनाशिकपालिकेतील स्थायी निवडणुकीलाही करोनाची लागण

पालिकेतील स्थायी निवडणुकीलाही करोनाची लागण

Subscribe

शासनाचे स्थगितीचे आदेश; १४ एप्रिलनंतरच होणार सभापतीपदाचा फैसला करोनामुळे महापालिकेची स्थायी समितीची निवडणूकही लांबणीवर पडली असून तसा आदेशच शासनाने अवर सचिव विवेक कुंभार यांनी पारीत केला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेनेचा सुरु असलेला लढा काही दिवसांसाठी थांबला आहे.

करोनामुळे महापालिकेची स्थायी समितीची निवडणूकही लांबणीवर पडली असून तसा आदेशच शासनाने अवर सचिव विवेक कुंभार यांनी पारीत केला आहे. त्यामुळे महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेनेचा सुरु असलेला लढा काही दिवसांसाठी थांबला आहे.
महापालिकेतील सभागृहात भाजपचे संख्याबळ घटल्याने स्थायी समितीवरील तौलानिक संख्याबळही घटले आहे. असे असतानाही महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेत भाजपचे संख्याबळ न घटवता आणि शिवसेनेचे न वाढवता नवनियुक्त सदस्यांची नावे घोषित केली. त्याविरोधात शिवसेनेने थेट शासनाकडे तक्रार करुन निवडणुकीला स्थगिती मिळविली. या स्थगितीच्या विरोधात भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६ मार्चला गुप्त मतदानपद्धतीने निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मतदानाची वेळच आली नाही. जिल्हाधिकार्‍यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला. विभागीय आयुक्तांनी तो न्यायालयासमोर ठेवला. त्यावरुन न्यायालय सभापतीपदाचा फैसला सुनावणार असतानाच शिवसेनेचे विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त व विभागीय आयुक्तांच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात शिवसेनेचे म्हणने ऐकून घेण्याची मागणी केल्यानंतर न्या. एस. जे. काथावाला यांनी १९ मार्चला सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुंबईत करोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने न्यायालयाच्या कामकाजावर मर्यादा आल्या. त्यानंतर २६ मार्चला सुनावणीचे आदेश दिले होते. देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्याने १४ एप्रिलनंतरच सभापतीपदाचा फैसला होणार आहे. तशा आशयाचा आदेश शासनाच्या अवर सचिवांनी शुक्रवारी काढत निवडणुकांना स्थगिती देण्यात येत असल्याचे त्यात म्हटलेे.

पालिकेतील स्थायी निवडणुकीलाही करोनाची लागण
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -