घरCORONA UPDATECoronaVirus - रेल्वेच्या हमालांनी बिग बींकडे मागीतली मदत!

CoronaVirus – रेल्वेच्या हमालांनी बिग बींकडे मागीतली मदत!

Subscribe

‘लोग आते है लोग जाते है… सारी दुनिया का बोझ हम उठाते है…’ या ओळींतून ज्यांच्या कष्टाला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी कुलीना एक नविन चेहरा दिला, ते ‘कुली’ अर्थात हमाल करोनांमुळे संकटात सापडलेले आहे. संपूर्ण रेल्वे स्थानकच लॉक डाऊन झाल्याने सध्या २५  हजार कुली कामगारांवर  उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे त्यांनी  बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांना ट्विट करत मदतीची मागणी केली आहे.

- Advertisement -

भारतीय रेल्वे स्थानकावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या जगणाऱ्याची संख्या प्रचंड मोठी आहे. काही नियमानुसार तर कोणी नियमाबाह्य पध्दतीने, पण रेल्वेच्या साहाय्याने जगतात. आता मात्र २१ दिवसांसाठी रेल्वे स्थानकच लॉक डाऊन झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. संपूर्ण भारतातील २५ हजार  कुलींवर उपासमारीची वेळ आली आहे. आज देशभरात लायसन्स धारक २५  हजार कुली रेल्वे स्थानकांवर कार्यरत आहे. तर महाराष्ट्र मध्ये १ हजार ८७३  कुली आहे. यांची सर्वाधिक संख्या ५५०  ही एकट्या  भुसावळची आहे. मुंबईतील सीएसटीम, मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला कल्याण  तसेच  या सर्व रेल्वेस्थानकांवर मिळून पूर्वी २  हजार कुली होते.

करोना नाही तर उपासमारीने मरू

देशभरता करोना विषाणूने थैमान घातले आहे. तसेच १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषणा केली आहे. त्यामुळे करोनाने रेल्वेची चाके थांबविली आहे. मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. अनेक कुली मुंबईतील रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करून  आपला उदरनिर्वाह चालवित होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संचारबंदी हाच एकमेव उपाय असल्याने रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सारेच कुली आपल्या घरी बसले आहेत, पण त्यांचा जगण्याचा मार्ग म्हणजे एकमेव रेल्वे. करोनापासून वाचले तर उपासमारी मरून अशी  चिंता त्यांना लागली आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून मदतीची बॉलिवूड अभिनेता अभिताभ बच्चन आणि रेल्वेला ट्विटरचा माध्यमातून यांच्याकडे मदतीची हाक मारली आहे अशी माहिती

संपूर्ण महाराष्ट्रात   रेल्वे स्थानकावर दोन हजार कुली आहेत. करोनामुळे संचारबंदी असल्यामुळे कुली आपल्या गावी परत गेले असून पण त्याच्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. कुलींचा संपूर्ण उदरनिर्वाह रेल्वेवर अवलबूंन आहे. पण रेल्वेगाड्या बंद असल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही दुसरा धंदा नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना आर्थिक मदत मिळावी. म्हणून बॉलिवूडमधील महानायक अभिताभ बच्चन आणि रेल्वेला ट्विटरचा माध्यमातून यांच्याकडे मदतीची हाक मारली आहे.

-अशोक आव्हाड,  कुली, सीएसएमटी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -