घरताज्या घडामोडीप्राणी मित्र सांगतायत, लॉकडाऊनमध्ये  भटक्या प्राण्यांची कशी घ्या काळजी!

प्राणी मित्र सांगतायत, लॉकडाऊनमध्ये  भटक्या प्राण्यांची कशी घ्या काळजी!

Subscribe

मुंबईतील काही सामाजिक संस्थांचे प्राणी मित्र मुंबईतल्या विविध भागातील भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचे काम करत आहेत.

राज्यासह संपूर्ण देशात सध्या कोरोनामुळे लॉक डाऊन घेण्यात आला असून, या लॉक डाऊनमुळे जसा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यापेक्षा जास्त पटीने त्रास भटक्या प्राण्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील रस्ते ओस पडल्यामुळे प्राण्यांवर उपास मारीचे वेळ आलेली आहे. शहरी भागात त्या त्या परिसरातील प्राणी मित्र या भटक्या प्राण्यांकडे लक्ष देत असले तरी ग्रामीण भागात मात्र भटक्या कुत्र्यांचे हाल होतानाचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्या घराखाली एखादं भटके कुत्रे आले तर त्याला थोडेसे खाऊ घाला असे आवाहन प्राणी मित्रांकडून केले जात आहे.

प्राणी मित्र

- Advertisement -

मुंबईत अशी घेतली जाते भटक्या प्राण्यांची काळजी –

मुंबईत सध्या लॉकडाऊनमुळे ना रस्त्यावर माणसे आहेत ना दुकाने उघडी आहेत. त्यामुळे सुमसान असलेल्या मुंबईच्या रस्त्यावर फक्त भटके कुत्रे फिरताना दिसत आहेत. मात्र या काळात मुंबईमध्ये या भटक्या प्राण्यांची काळजी ही प्राणी मित्रांकडून घेतली जात आहे. मुंबईतील काही सामाजिक संस्थांचे प्राणी मित्र मुंबईतल्या विविध भागातील भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचे काम करत आहेत. मुंबईच्या प्रत्येक विभागात प्राणी मित्रांना ऍनिमल वेल्फेअर  बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने काही वर्षापूर्वी डॉग फिडरचे कार्ड दिले असून, हे डॉग फिडर त्यांच्या त्यांच्या भागात जाऊन भटक्या कुत्र्यांची काळजी घेत त्यांना खायला देत आहेत. तसेच हे कार्ड असलेल्यांना पोलीस देखील सहकार्य करत आहेत.

 मुंबईमध्ये सध्या भटक्या प्राण्यांची काळजी डॉग फिडर कडून चांगल्या पद्धतीने घेतली जात आहे. हे डॉग फिडर त्यांच्या त्यांच्या भागात जाऊन त्यांना खाद्य पुरवतात.

– मनीष पिंगळे, डॉक्टर

 

मुंबईमध्ये आपचे प्राणी मित्र त्यांच्या त्यांच्या विभागात जाऊन भटक्या प्राण्यांची काळजी घेत आहेत. तसेच पोलीस देखील आम्हाला सहकार्य करत आहेत. तरी देखील जर कुणा प्राणी मित्राला अडचण येत असेल तर त्यांनी 9833480388 या नंबरवर फोन करणे.

सुनिष सुब्रमण्यन कुंजु, मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी –  मुंबई

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -