घरCORONA UPDATEधक्कादायक! ५० डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

धक्कादायक! ५० डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

देशभरात कोरोना बाधित रुग्णांना सेवा देण्याचे आणि जीव वाचविण्याचे पवित्र काम आरोग्य सेवेतील कर्मचारी करत आहेत. मात्र हे करताना त्यांना देखील कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार ५० डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. आता ही लागण कोरोना बाधित रुग्णाकडून झाली की बाहेरून झाली आहे? याचा बारीक तपास आरोग्य मंत्रालयाकडून केला जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, सर्वाच ५० प्रकरणात रुग्णाकडून डॉक्टरांना संसर्ग झाला असे नाही. काही प्रकरणात परदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे देखील डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. आता बाहेरच्या व्यक्तीमुळे संसर्ग झालेल्यांची शोध मोहीम आरोग्य मंत्रालयाने हाती घेतलेली आहे.

- Advertisement -

काही लोकांनी यावर टीका करताना सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टारांकडे पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्विपमेंट (PPE) उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. ईटलीमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना होण्याची संख्या जास्त आहे. इटलीत रुग्णांची संख्या देखील अधिक होती, त्यांच्यावर उपचार करत असताना आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून काहींचा मृत्यू देखील झाला आहे.

भारतात देखील कोरोना बाधित डॉक्टरांचा वाढत जाणारा आकडा चिंताजनक आहे. भारतीय लष्कर आणि केंद्रीय सुरक्षा बलातील प्रत्येकी एक डॉक्टर कोरोनाबाधित झाला आहे. त्यामुळे लष्करातील जवानांवर देखील संकट उभे राहिले आहे. तसेच दिल्लीतल एम्स (AIIMS) या संस्थेचे एक डॉक्टर पॉझिटिव्ह आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -