घरCORONA UPDATEरिलायन्स चीनमधून मागवणार मास्क, सॅनिटायझर; त्यासाठी दहा चार्टर्ड विमानांची मागणी

रिलायन्स चीनमधून मागवणार मास्क, सॅनिटायझर; त्यासाठी दहा चार्टर्ड विमानांची मागणी

Subscribe

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता चीनमधून हँड सॅनिटायझर आणि मास्कसारख्या उपयुक्त वस्तू मागवण्याच्या तयारीत आहेत.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता चीनमधून हँड सॅनिटायझर आणि मास्कसारख्या उपयुक्त वस्तू मागवण्याच्या तयारीत आहेत. याकरता एअर इंडियाच्या १० चार्टर्ड विमानांची आवश्यकता असून त्यासंबंधीची चर्चा कंपनीची सुरू आहे. या व्यतिरिक्त इतरही कंपन्या चीनमधून मेडिकल साधनं मागवण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांची नागरी उड्डाण मंत्रालयासोबत चर्चादेखील सुरू असल्याचे सांगितले जात आहे. जर एअर इंडियाने रिलायन्सला १० चार्टर्ड विमानं दिली तर एखाद्या देशातून कोरोनासाठीच्या आरोग्य संबंधीत साधनं आणणारी ही पहिली भारतीय एअर लाईन्स ठरेल. या चार्टर्ड विमानांच्या पाठवण्याकरता नागरी उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी इतर राज्य आणि एअरलाईन्ससोबत समन्वय साधत आहे.

देशांतर्गत ‘लाइफलाइन उडान’ची सेवा

कोविड – १९ या कोरोना व्हायरसपासून मुकाबला करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाने लाइफलाइन उडानची सेवा उपलब्ध केली आहे. हे सेवा देशभरात आवश्यक मेडिकल आणि इतर सामग्री पुरवते. १ एप्रिल २०२० पर्यंत देशभरात साधारण ७४ मेडिकल कार्गो फ्लाइट्स चालवण्यात आल्या आहेत. तसेच एअर इंडियाच्यासोबतच ब्लू डार्ट आणि स्पाइसजेट एक्सप्रेसच्या कार्गो फ्लाइट्सही चालवल्या जात आहेत.

तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मुंबईतील भारतातील पहिले कोविड – १९ समर्पित रुग्णालय तयार करणार असल्याचे यापूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे. त्यासोबतच फेस-मास्क उत्पादन क्षमता वाढवेल आणि मोफत जेवण आणि इंधन प्रदान करेल. कोणतेही काम  झाले नाही तरी कंत्राटी आणि तात्पुरते कामगारांना पगार देण्यात येईल. भारतात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत, ज्यात आवश्यकतेनुसार आणखी प्रमाणात वाढ करता येईल, असेदेखील त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -