घरमहाराष्ट्रएसटीच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आले धावून

एसटीच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आले धावून

Subscribe

करोनामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांसाठी एसटी महामंडळाकडून एसटी बस सेवा पुरविण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना जेवणाची व्यवस्था नसल्याने जेवणासाठी भटकंती करावी लागते. यांची माहिती मिळताच पालकमंत्री एकनाथ शिंदे धावून आले. त्यांनी व अनेक सामाजिक संस्था मिळून एसटी आगारातील कर्मचार्‍यांना जेवणाचे पॅकेट देण्यात येत आहे. तसेच एसटी महामंडळाकडून कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नयेत, यासाठी एसटी अधिकारी वर्ग सुद्धा जोमात कामाला लागले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल कर्मचारी, अशा अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांच्या वाहतुकीचा भार एसटी महामंळावर देण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागामार्फत शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे या तिन्ही विभागाचे काही कर्मचारी गावाला निघून गेले होते.

- Advertisement -

त्यामुळे एसटी महामंडळाने चालक आणि वाहकांची कमतरता भासू नये यासाठी सोलापूर, सातारा रत्नागिरी आणि रायगड विभागाचे कर्मचारी बोलवून घेण्यात आले आहे. आदेश येताच या विभागातून जवळ जवळ 50 कर्मचारी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागात दाखल झाले. मात्र, त्यांच्या राहण्याची व्यवस्था तर झाली. मात्र, सर्व कॅन्टीन आणि हॉटेल बंद असल्याने त्यांना जेवणाची भटकंती करावी लागत होती. यांची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कर्मचार्‍यांना जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. तसेच जिथे मदत पोहचत नाही अशा आगारांच्या कॅन्टीनमध्ये एसटी महामंडळ शिधा देऊन कर्मचार्‍यांसाठी जेवण तयार करत आहे.

आदेशाची अंमलबजावणी सुरू
कार्यरत असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या निवास, न्याहारी, भोजनाची व्यवस्था करावी, तसेच कामगिरीवर हजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझर प्रशासनाकडून पुरविण्यात यावे, असे आदेश वाहतूक महाव्यवस्थापक यांनी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे. कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात येत आहे. एक अधिकारी यांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले की, मुरबाड डेपोत कर्मचार्‍यांची जेवणाची सोय नव्हती तेव्हा आम्ही कॅन्टीनमध्ये शिधा देऊ कर्मचार्‍यांची जेवण्याची सोय केलेली आहे. एसटी कर्मचार्‍यांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही दक्षता घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -