घरमहाराष्ट्रतरुणांचा उच्छाद! पणत्यांच्या जागी फोडले फटाके; सोलापूर विमानतळ परिसरात मोठी आग

तरुणांचा उच्छाद! पणत्यांच्या जागी फोडले फटाके; सोलापूर विमानतळ परिसरात मोठी आग

Subscribe

सोलापुरातील काही अतिउत्साही तरुणांनी फटाके फोडल्याने या फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने येथे मोठी आग लागली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील दिवे बंद करुन पणत्यांचे दिवे, मोबाईल फ्लॅश, मेणबत्ती लावण्याचे आवाहन देशातील जनतेला केले होते. मात्र सोलापुरातील काही अतिउत्साही तरुणांनी चक्क फटाके फोडले. या फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने रविवारी रात्री या परिसरात मोठी आग लागली. अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काल रात्री ९ वाजता घरातील लाईट बंद करुन घरात, अंगणात, गॅलरीमध्ये किंवा रस्त्यावर दिवे, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र याचवेळी काही तरुणांनी उच्छाद मांडत मशाली पेटवल्या, रस्त्यावर रॅली काढले, फटाके फोडले.

- Advertisement -

मागील काही वर्षांपासून बंद असलेल्या सोलापूर विमानतळाच्या परिसरात काल रात्री मोठी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अतिउत्साही तरुणांनी फोडलेल्या फटाक्यांच्या ठिणग्या विमानतळ परिसरात पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळ बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आहे. त्यामुळे ही आग जास्तच पसरली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळच्या आटोकाट प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेची माहिती घेत काळजी करण्यासारखे काही नसल्याची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली.

हेही वाचा –

Coronavirus : लॉकडाऊन नंतरही सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -