घरCORONA UPDATEअजित डोवाल तबलीगी जमातच्या मौलानांना का भेटले? अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल

अजित डोवाल तबलीगी जमातच्या मौलानांना का भेटले? अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, महाराष्ट्रात याचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच तबलीगी मरकजच्या निजामुद्दीनमधील कार्यक्रमानंतर राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय नेतृत्वाला काही सवाल केले आहेत. ‘महाराष्ट्रात होणाऱ्या तबलिगींच्या कार्यक्रमाला आम्ही परवानगी दिली नाही. मात्र, निजामुद्दीन पोलीस स्टेशनच्या शेजारी झालेल्या या कार्यक्रमाला का थांबवलं नाही?’ असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, यावेळी अनिल देशमुख यांनी ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मौलाना यांना का भेटले? त्यानंतर मौलाना कुठे गायब झाले? अशावेळी दिल्ली पोलीस आयुक्त काय करत होते?’ असे एक ना अनेक प्रश्न केंद्राला विचारले आहेत.

काय आहे अनिल देशमुख यांच्या पत्रात?

मुंबईचं उपनगर वसई येथे १५ आणि १६ मार्चला ५० हजार तबलिगी जमणार होते. त्या आयोजनाला महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने परवानगी नाकारून रोखले. केंद्रात गृहमंत्रालयाने निजामुद्दीन, दिल्लीमध्ये तबलिगी मर्कजच्या कार्यक्रमाला परवानगी का दिली? असे पत्रात विचारण्यात आले. तसेच निजामुद्दीनच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असे असूनही या आयोजनाला का थांबवलं नाही? याच्यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का? असा प्रश्न देखील अनिल देशमुख यांनी विचारला. इतकेच नाही तर ज्या पद्धतीने या मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यांत झाला, ह्या करता केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रात्री दोन वाजता मर्कजमध्ये का पाठवलं? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचं आहे की दिल्ली पोलिसांचं? असा सवाल देखील देशमुख यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

रात्री दोन वाजता काय गुप्त चर्चा झाली?

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तबलिगी जमातचे मौलाना यांच्यात रात्री दोन वाजता काय गुप्त चर्चा झाली? असे विचारत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त या दोघांनी या विषयावर बोलणं का टाळलं? एवढेच नाही तर अजित डोवाल यांनी भेटल्यानंतर मौलाना साहेब कुठे गायब झाले? आता ते कुठे आहेत? असा प्रश्न देखील उपस्थित केला. तसेच मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची, मग कार्यक्रमाला का रोखलं नाही तुम्ही? असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -