घरताज्या घडामोडीCoronaVirus: दोन मुलींनंतर निर्माता करीम मोरानीला कोरोनाची लागण!

CoronaVirus: दोन मुलींनंतर निर्माता करीम मोरानीला कोरोनाची लागण!

Subscribe

प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दोन्ही मुलींना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या करीम मोरानीला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीला म्हणजेच अभिनेत्री झोया मोरानीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

झोया ही मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परत आली होती. झोयाची लहान बहीण शाजा मोरानी हिचा देखील सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल समोर आला होता. शाजा ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेतून परतली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला देखील मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

आता करीम मोरानी याच्यावर उपचार सुरू असून त्याला कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीला त्याच्या भावाने दुजोरा दिला आहे. करीम मोरानी ‘रा. वन’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘हॅप्पी न्यू इअर’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांचा निर्माता आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व चित्रपटसृष्टीत कलाकार मंडळी मदतीचा हात पुढे करत आहेत.


हेही वाचा – Coronavirus: वरूण धवनचा पुन्हा पुढाकार; मेडिकल स्टाफसाठी केली जेवणाची व्यवस्था

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -