घरCORONA UPDATECoronavirus : बाधित क्षेत्रातील कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट; जैविक कचऱ्याप्रमाणे लावली जाते विल्हेवाट

Coronavirus : बाधित क्षेत्रातील कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट; जैविक कचऱ्याप्रमाणे लावली जाते विल्हेवाट

Subscribe

कचऱ्यामुळे होणारा संसर्ग रोखण्याचाही प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत असून अशा बाधित क्षेत्रातील कचऱ्या विल्हेवाट जैविक कचऱ्याप्रमाणेच लावली जात आहे.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ६०० वर पार झाली असून ज्या भागांमध्ये अशाप्रकारचे रुग्ण आढळून येत आहे, त्या इमारती, चाळी , झोपडपट्टींना बाधित क्षेत्र म्हणून प्रतिबंधित करण्यात येत आहे. मात्र, या बाधित क्षेत्रात जंतूनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात असले, तरी याठिकाणी निर्माण होणारा कचरा तेवढा घातक ठरु शकतो. या कचऱ्यामुळे होणारा संसर्ग रोखण्याचाही प्रयत्न महापालिकेच्यावतीने होत असून अशा बाधित क्षेत्रातील कचऱ्या विल्हेवाट जैविक कचऱ्याप्रमाणेच लावली जात आहे.

मुंबईत कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कचऱ्याचे प्रमाण आता ३० ते ३५ टक्क्यांनी कमी झाले आहे. मात्र, मुंबईतील सर्वच भागांमधून दरदिवशी महापालिका आणि विविध खासगी स्वयंसेवी संस्थांचे कामगार घरोघरी जावून गोळा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्वाचे असून घनकचरा विभागाचे सफाई कामगार आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र, ज्या भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागांना महापालिकेच्यावतीने बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करत त्या इमारती व चाळी तसेच झोपडपट्टीतील प्रत्येक घरांचे निर्जंतुकीकरण केले जाते. परंतु या भागात दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणेही तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे या बाधित क्षेत्रातील कचराही जमा करून महापालिकेचे सफाई कामगार जीव धोक्यात घालून तो वाहून नेत त्यांची विल्हेवाट लावत आहे.

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत एकूण  ६०० हून अधिक करोनाग्रस्त आढळून आले असून  २४१ बाधित क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. या २४१ बाधित क्षेत्रामध्ये दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेगळ्याप्रकारे विल्हेवाट महापालिकेच्यावतीने लावण्यात येते. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित क्षेत्रातील कचऱ्याची दैनंदिन विल्हेवाट लावण्यात येते. सर्व प्रथम प्रत्येक बाधित क्षेत्रातील कचरा स्वतंत्र गोळा करून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर ते वेगळ्यापध्दतीने वाहून नेत देवनार डम्पिंग ग्राऊंडवर खोलवर खड्डा खणत त्याची विल्हेवाट लावण्यात येते. कचरा खड्डयात टाकल्यानंतर खड्डा बुजवल्यानंतरही त्या भागावर पुन्हा जंतूनाशकाची फवारणी करून तो परिसर पुन्हा निर्जंतुकीकरण केले जाते.  त्यामुळे प्रत्येक दिवशी अशाप्रकारे बाधित कचऱ्याची जैविक कचऱ्याप्रमाणे विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -