घरदेश-विदेशलॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर चक्क दिसताय ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा!

लॉकडाऊनमध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर चक्क दिसताय ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा!

Subscribe

पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. मात्र ९ मार्च रोजी पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार बुद्ध विहार भागात उघडकीस आला.

देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे दिल्लीतील हॉटस्पॉटची संख्या देखील २५ झाली आहे. बुधवार पर्यंत ही संख्या २० होती. यामध्ये निजामुद्दीनच्या दोन नव्या ठिकाणांचा समावेश झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील अनेक परिसर सील करण्यात आले आहे. अशा परिस्थिती दिल्लीमध्ये काही बातम्यांमुळे चर्चांना उधाण आले आहे. लॉकडाऊनदरम्यान दिल्लीच्या द्वारका सेक्टर ४ मध्ये पोलिसांना रस्त्यावर ५०० आणि २००० रूपयांच्या नोटा पडलेल्या दिसत आहे.

एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांना सर्वात पहिले ५०० रूपयांच्या तीन नोटा पडलेल्या दिसल्या. कोणाच्या चुकीमुळे या नोटा रस्त्यावर पडल्या असतील म्हणून पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. मात्र ९ मार्च रोजी पुन्हा दुसऱ्यांदा असाच प्रकार बुद्ध विहार भागात उघडकीस आला. यावेळी या भागातील रस्त्यावर दोन हजार रूपयांच्या अनेक नोटा पोलिसांना सापडल्या. परंतु यावेळी एका माणसाने दावा केला की, या नोटा त्याच्याकडून चुकून या रस्त्यावर पडल्या. द्वारका भागातील घडलेल्या या प्रकाराबद्दल अद्याप कोणीही एफआयआर दाखल केलेला नाही, असे डीसीपींनी सांगितले.

- Advertisement -

CoronaVirus: देशात कोरोना पसरवण्याचं षडयंत्र; ४० ते ५० कोरोना संशयित नेपाळमार्गे भारतात!

दिल्लीत वाढतोय कोरोनाग्रस्तांचा आकडा

गेल्या २४ तासांमध्ये ५२ नवीन कोरोना रुग्णांनंतर दिल्लीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ७२० झाली आहे. या काळात तीन लोकांचा मृत्यूही झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता १२ झाली आहे, तर आतापर्यंत २५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७२० पैकी ४३० रूग्ण हे मरकजशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -