घरताज्या घडामोडीराज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा

राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा

Subscribe

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी

नाशिक : राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 ऐवजी 60 करण्याची मागणी होऊ लागली आहे. प्रत्येक वर्षी साधारणत: 25 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. करोनामुळे कर्मचार्‍यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे. राज्य सरकारी कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त होतात. दरवर्षी एकूण पदसंख्येच्या 3 टक्के म्हणजेच साधारणत: 25 हजार कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्याचा शासकीय कामावर ताण पडण्याची शक्यता वर्तवली जाते. करोनाच्या काळात प्रचलीत प्रशासकीय कार्यपध्दतीमुळे उपलब्ध सरकारी कर्मचारी मनुष्यबळात कपात करु नये. तसेच निवृत्तीचे वय 60 वर्ष असावे, या मागणीचा विचार करण्यासाठी आयएएस अधिकारी बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिला आहे. परंतु, हा विषय मागील शासनाच्या कालावधीत प्रलंबित राहिला आहे. आता, किमान दोन वर्षे मनुष्यबळाची कपात होऊ नये यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची मागणी संघटनेनी केली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -