घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची उदासिनता वाढली

लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची उदासिनता वाढली

Subscribe

मानसोपचार तज्ञांचे मत: केटीएचएम महाविद्यालयात समुपदेशन केंद्र सुरु

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात सर्वांसोबत तरुण मुलेही घरातच अडकून पडल्याने त्यांना आता मोबाईल व इंटरनेटचे व्यसन जडते आहे. मोबाईलच्या अतिरीक्त वापरामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असून, घरात चिडचिडेपणाही वाढला आहे. इतकेच नव्हे तर निद्रानाश होऊन प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मकदृष्टीने बघण्याची सवय जडत असल्याने दिवसेंदिवस त्यांची उदासिनता वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.
करोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत आपली नोकरी टिकेल की नाही, याची सध्या अनेकांच्या मनात धास्ती वाढलेली दिसते. महाविद्यालयीन युवक हे मोबाईलमध्ये गुंतल्याने त्यांच्या मानसिकतेवरच परिणाम होत आहे. भविष्यात नेमके काय होईल? याचा अंदाज कोणालाच येत नसल्याने यातूनच त्यांच्या मनात उदासिनतेनी घर केले आहे. राजकीय निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे आकड्यांचा खेळ रंगतो, त्याप्रमाणे सध्या मीडियावर सर्वत्र आडक्यांचा खेळ चालू आहे. सतत एखादी गोष्ट बिंबवली जात असल्याने त्याचाही परिणाम मानसिकतेवर होतो. त्यामुळे तरुण मुले मन रमवण्यासाठी मोबाईलचा आधार घेतात. वेगवेगळ्या वेब सिरीज बघण्याचे पेव आता चांगलेच फुटले आहे. वयस्कर व्यक्तींसाठी असलेल्या वेबसिरीज अल्पवयीन मुले सर्रासपणे बघत असल्याने त्याच्यांत थोड्याफार प्रमाणात हिंसक वृत्ती बळावते. घरात मनाप्रमाणे गोष्ट न घडल्यास चिडचिडेपणा वाढतो. यातूनच भांडणे सुरु होतात. विशेष म्हणजे मुलांमधील संवेदनशिलता कमी होत असल्याने मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
&
मविप्रचे समुपदेशन केंद्र
विद्यार्थ्यांंचे समुपदेशन करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या मानसशास्त्र विभागाने समुपदेशन सेवा सुरु केली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक मुकुल चौधरी (7775853988), विभागप्रमुख रुबी युनियल (9422979416), स्वाती पवार (9623947707), सारीका क्षीरसागर (9579254497) व संगीता पाडवी (9822586400) यांची मार्गदर्शक म्हणुन नियुक्ती केली आहे.
&
घरात बसून कंटाळलेले विद्यार्थी मोबाईल व इंटरनेटच्या व्यसनाधिन जात आहेत. त्याचा चिडचिडेपणा वाढत चालला असून इतरही समस्या भेडसावत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा मुलांना विविध थेरपीव्दारे या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
-मुकुल चौधरी, सहायक प्राध्यापक (मानसशास्त्र विभाग)

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -