घरCORONA UPDATELockDown: रेल्वे प्रवाशांना दिलासा; आता घर बसल्या मिळणार तिकिटांचे रिफंड

LockDown: रेल्वे प्रवाशांना दिलासा; आता घर बसल्या मिळणार तिकिटांचे रिफंड

Subscribe

रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर काढण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांचे पैसे आता प्रवाशांना घर बसल्या मिळणार आहेत.

रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर काढण्यात आलेल्या रेल्वे तिकिटांचे पैसे आता प्रवाशांना घर बसल्या मिळणार आहेत. त्यांना रेल्वेच्या तिकिट खिडक्या सुरु होण्याची वाट पाहावी लागणार नाही. कारण आता तिकिट खिडकीवर काढलेल्या रेल्वे तिकिटांचा रिफंड देण्याची सोय आयआरसीटीसीने केली आहे. त्यासाठी रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइनवरून काही पर्याय वापरून ग्राहकांना घरी बसूनच त्यांच्या तिकिटांचा परतावा मिळणार आहे.

कोरोनाचा विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने १४ एप्रिल २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ दिवस म्हणजे ३ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रिमियम गाड्या, मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या, प्रवासी गाड्या, उपनगरी लोकल, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर काढण्यात आलेल्या रेल्वे तिकीट रद्द केल्या आहेत. तसेच प्रवाशांच्या बँक खात्यात रिफंडची रक्कम स्वयंचलीतपणे पाठवली गेली आहे. मात्र ज्या प्रवाशांनी २४ मार्च ते ३ मे दरम्यान रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरून तिकिटं काढली होती. त्यांची तिकिटं रद्द करता आलेल्या नाहीत. कारण लॉकडाऊन काळात भारतीय रेल्वेचे सर्व आरक्षण केंद्र बंद होते. मात्र आता आय‌आरसीटीसीने एक योजना आखली आहे. त्यानुसार रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वरून काही पर्याय वापरताच रिफंडची रक्कम स्वयंचलीतपणे त्यांच्या खात्यात वळवण्याची सोय केल्याचे आय‌आरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी सांगितले.

- Advertisement -

१ कोटी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटे रद्द

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहेत. त्यामुळे देशातील प्रीमियम, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, उपनगरीय गाड्या, कोलकाता मेट्रो रेल, कोकण रेल्वे सेवा ३ मेपर्यंत रद्द केल्या आहेत. आतापर्यंत देशभरात १ कोटी ५ लाखांहून अधिक प्रवाशांनी तिकिटे रद्द केली असून त्या बदल्यात ७२५ कोटी रुपये रिफंडची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा –

LockDown: मुंबई, पुणे वगळता राज्यात वृत्तपत्र वितरणाला शासनाची मंजूरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -