घरCORONA UPDATEपुण्यात कोरोनाचा कहर; यामुळे ७४ हॉटेल्स आणि ३०० शाळा सज्ज!

पुण्यात कोरोनाचा कहर; यामुळे ७४ हॉटेल्स आणि ३०० शाळा सज्ज!

Subscribe

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांनी तीन रुग्णालये फुल्ल झाली आहेत. त्यामुळे आता हॉटेल्स आणि शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे.

देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे याठिकाणी कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, पुण्यात कोरोनाचा धोका कमी होताना दिसत नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात गुरुवारी दिवसभरात सर्वाधिक म्हणजे १०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसचे या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून या रुग्णांनी आता पुण्यातील तीन रुग्णालय देखील फुल्ल झाली आहेत. त्यामुळे आता शहरातील वसतिगृह अधिग्रहित केली जात असून पुण्यातील ७४ हॉटेल्स, ३०० शाळा कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्या जात आहेत.

या ठिकाणी सर्वात अधिक संख्या

पुण्यात कोरोनाची सर्वात अधिक रुग्णसंख्या ही भवानी पेठेत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, या आठवड्याच्या शेवटी १ हजार ५०० आणि १५ मेपर्यंत ३ हजारपर्यंत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील १४ खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु असून दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे.

- Advertisement -

४३ हजार रुग्णांची क्षमता

कोरोना रुग्णांसाठी ७४ हॉटेल्स अधिग्रहित असून यामध्ये ४२ हजार रुग्णांची क्षमता आहे. तर ३०० शाळांमध्ये २० हजार नागरिकांची सोय करण्याचे नियोजन केले आहे.

दरम्यान, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी आता प्लाझ्मा थेरिपीचा वापर केला जाणार आहे. येणाऱ्या काळात बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये या उपचार पद्धतीला सुरुवात होणार असून यामुळे निश्चितच कोरोनाचा अटकाव करण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाच्या सर्व चाचण्या होणार मोफत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -