घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, २५ झोपड्या जळून खाक

नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, २५ झोपड्या जळून खाक

Subscribe

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत आज, सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे.

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत आज, सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या आगीमुळे २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमनचे जवान करीत आहेत. मात्र, अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टी परिसरात भीषण आग

- Advertisement -

नेमके काय घडले?

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीला आज सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यादरम्यान, एकामागोमाग सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. या आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरु आहेत.


हेही वाचा – औरंगाबाद : एकाच कुटुंबातील तीन महिला कोरोनाबाधित

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -