घरCORONA UPDATECoronaVirus : ठाणे पोलीस दलातील ५५ वर्षां पुढील पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीची मागणी 

CoronaVirus : ठाणे पोलीस दलातील ५५ वर्षां पुढील पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टीची मागणी 

Subscribe

मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयानंतर ठाणे पोलीस दलातील ५५ वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी राहण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी मनसेने ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊन मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षे वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई पोलीस आयुक्तांच्या या निर्णयानंतर ठाणे पोलीस दलातील ५५ वर्ष वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी राहण्याची सूचना देण्यात यावी, अशी मागणी मनसेने ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. ठाणे पोलीस दलातील ५५ वर्षे वयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यामध्ये ही चर्चा दबक्या सुरु आहे.

कोरोना या आजाराने देशात थैमान घातलेले आहे, इतर राज्यापेक्षा महराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले असून मृत्यूची संख्या देखील सर्वाधिक आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी रस्त्यावर उभे असलेल्या पोलिसांना ही कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरातील पोलीस दलात मागील काही आठवड्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहे. मुंबई पोलीस दलात मागील तीन दिवसात कोरोनाने तीन पोलिसांचे प्राण घेतले आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेले सर्वाधिक ५५ वर्षा पुढील नागरिकाचा समावेश आहे, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब या सारखे आजार असणाऱ्या व्यक्तीला कोरोनाच्या विषाणूची बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. मुंबई पोलीस दलातील मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे वय देखील ५५ च्या पुढे होते, तसेच त्यांना  उच्च रक्तदाब, मधुमेह, ताणतणाव यासारखे आजार असल्याचे समोर आले. या पुढे पोलीस दलात हि संख्या वाढू नये यासाठी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ५५ वर्षांपुढील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी बसा, आरोग्याची घ्या, असा सल्ला नुकत्याच काढलेल्या पत्रकात दिला आहे.

- Advertisement -

मुंबई पाठोपाठ ठाणे पोलीस दलात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत असून, पोलीस दलातील कोरोनाची संख्या जवळपास १००च्या घरात गेली आहे, सुदैवाने यामध्ये अद्याप कुणाचाही म्रुत्यु झाला नाही. मात्र, भविष्यात ठाणे पोलीस दलात कोरोनाची संख्या वाढू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांपुढील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी बसण्याची सूचना देण्यात यावी अशी मागणी ठाण्यातील मनसेचे ठाणे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या ठाणे पोलीस दलातील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे, अशा परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्तव्य बजावण्यासाठी बस, मोटारसायकल या वाहनानी यावे लागते, आम्हालाही मुंबई पोलिसांप्रमाणे घरी बसण्याची मुभा देण्यात यावी, अशी चर्चा ठाणे पोलीस दलात सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -