घरट्रेंडिंग'ऋषी कपूर यांच्या जाण्याने आमचे मोठे नुकसान' चित्रपटसृष्टी हळहळली!

‘ऋषी कपूर यांच्या जाण्याने आमचे मोठे नुकसान’ चित्रपटसृष्टी हळहळली!

Subscribe

बॉलिवूड कलाकारांनी ट्वीट करत दिला ऋषी कपूर यांचा अखेरचा निरोप

बॉलिवूड विश्वाला सलग दुसऱ्या दिवशी दुसरा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांनी काल (29 एप्रिल) जगाला अलविदा केल्यानंतर आज (30 एप्रिल) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.बॉलिवूड कलाकारांपासून ते मराठी कलाकारांपर्यंत अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचं खास नातं होतं. त्यांच्या निधनानं बिग बींना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. ‘ आज सकाळीतो निघून गेला…ऋषी कपूर… तो निघून गेला… त्याचा मृत्यु झाला आहे मी खरंच खचलोय, उद्धवस्त झालोय”, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. नंतर त्यांनी ते ट्वीट डिलीट केलं.

- Advertisement -

 

‘काय बोलू?, काय लिहू काही समजत नाहीये, ऋषीजींच्या जाण्याने खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने सिनेक्षेत्राची मोठी हानी झालीय. हे दु:ख सहन करणं माझ्यासाठी कठिण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो’ असं लता मंगेशकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -