घरताज्या घडामोडीघरी परतणाऱ्या कामगारांचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार - सोनिया गांधी

घरी परतणाऱ्या कामगारांचा रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार – सोनिया गांधी

Subscribe

कष्टकरी लोकांच्या पाठीशी उभं राहण्याच्या या मानवी सेवा संकल्पात कॉंग्रेसचं हे योगदान आहे, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. या मजुरांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने विशेष रेल्वे सुरु केली आहे. दरम्यान, घरी परतणाऱ्या कामगारांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च कॉंग्रेस करणार असल्याची मोठी घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केली आहे. कॉंग्रेसने ट्वीट करून लिहिलं आहे की, “भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने निर्णय घेतला आहे की घरी परतणाऱ्या प्रत्येक गरीब कामगारांचा तिकीटाचा खर्च कॉंग्रेस करेल.”

सोनिया गांधी म्हणाल्या, “कामगार हे देशाचा कणा आहेत. त्यांची मेहनत आणि त्याग हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे. केवळ चार तासांच्या सूचनेवर लॉकडाऊन झाल्यामुळे लाखो कामगार घरी जाण्यापासून वंचित राहिले. १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच देशात हजारो कामगारांना शेकडो किलोमीटर चालून घरी परत जावं लागलं. रेशन नाही, पैसे नाहीत, औषधे नाहीत, साधन नाही पण फक्त गावी परत जाण्याची वचनबद्धता. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या वेदनेचा विचार करून थरथर कापू लागली. पण देशाचं आणि सरकारचं कर्तव्य काय? आजही लाखो कामगारांना संपूर्ण देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून घरी परत जायचं आहे. परंतु कोणतेही साधन, पैसा नाही. दुःखाची बाब म्हणजे या कष्टकरी लोकांना अडचणीच्या वेळी भारत सरकार आणि रेल्वे मंत्रालय रेल्वे प्रवास भाडं आकारत आहे.”

- Advertisement -

पुढे त्या म्हणाल्या, “कामगार हे राष्ट्र उभारणीचे राजदूत आहेत. जेव्हा आम्ही परदेशात अडकलेल्या भारतीयांना आपले कर्तव्य मानतो आणि त्यांना विमानाने विनामूल्य परत आणतो. गुजरातच्या एका कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून १०० कोटी वाहतूक आणि अन्न इत्यादीवर खर्च करतो, रेल्वे मंत्रालय पंतप्रधान कोरोना फंडाला १५१ कोटी देऊ शकतं, मग श्रमिक कामगारांना आपत्तीच्या या काळात मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा का देऊ शकत नाहीत?” असा सवाल सोनिया गांधींनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन लांबल्यास जनक्षोभाचा धोका; सुशीलकुमार शिंदेंना वाटतेय भीती


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, “कष्टकरी कामगारांना मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने वारंवार केली आहे. दुर्दैवाने ना सरकार ऐकले ना रेल्वे मंत्रालयाने. म्हणूनच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने निर्णय घेतला आहे की प्रत्येक घरी परतणाऱ्या कामगाराचा रेल्वे तिकिटाचा खर्च काँग्रेस करेल. कष्टकरी लोकांच्या पाठीशी उभं राहण्याच्या या मानवी सेवा संकल्पात कॉंग्रेसचं हे योगदान आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -